शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवऱ्याने प्रियांका चोप्राच्या बहिणीचा हात पकडताच अंकिता लोखंडे भडकली, कॅमेऱ्यासमोरच रागाने पाहिलं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 17, 2025 | 4:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vicky Jain Ankita Lokhande viral video

Video : नवऱ्याने प्रियांका चोप्राच्या बहिणीचा हात पकडताच अंकिता लोखंडे भडकली, कॅमेऱ्यासमोरच रागाने पाहिलं अन्...

इंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रिटी कपल आपल्या नात्याबाबत उघडपणे बोलणं टाळतात. मात्र अंकिता लोखंडे आणि विकी जैन या सगळ्याला अपवाद आहेत. अंकिता व विकीने हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेत त्यांच्या नात्याबाबत उघडपणे भाष्य केलं. कित्येकदा तर या शोमध्ये अंकिता व विकी यांच्यामध्ये टोकाची भांडणं झाली. दोघांच्या वादामध्ये विकीच्या कुटुंबानेही काही अंशी अंकिताला जबाबदार ठरवलं. मात्र शोमधून बाहेर आल्यानंतर सगळं काही निवळलं. पण या सगळ्यामध्ये अंकिता विकीवर जीवापाड प्रेम करत असल्याचं सतत दिसून आलं. विकी सहअभिनेत्रीशी किंवा इतर कोणत्याही अभिनेत्रीशी बोलत असेल तर अंकिताला ते पटत नाही. कित्येकदा ते कॅमेऱ्यासमोरही आलं. आता असाच एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. (Vicky Jain Ankita Lokhande viral video)

‘फौजी २’ चित्रपटाशी संबंधीत एका कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अंकिता व विकीही या कार्यक्रमात हजर होते. यादरम्यानचाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विकी प्रियांका चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्राशी बोलत आहे. विकीने मीराचा हात घट्ट पकडला होता. दरम्यान मीराचा हात पकडूनच तो तिच्याशी बोलत होता. हे संपूर्ण दृश्य अंकिता बाजूला उभं राहून पाहत होती.

आणखी वाचा – ९३ व्या वर्षी बायकोसाठी दागिना खरेदी करणारे आजोबा, सोनाराच्या दुकानात शिरताच…; डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood Videos (@instantbollywoodvideos)

विकी मीराचा हात पकडतो आणि स्वतःच्या छातीजवळ आणतो. विकी-मीराचं असं वागणं अंकिताला अजिबात पटलं नसल्याचं कॅमेऱ्यामध्ये दिसून आलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही बदलले. अंकिताला राग आला आणि ती एकटक विकी-मीराकडेच बघत होती. विकीचं बोलणं झाल्यानंतर तो जेव्हा अंकिताकडे आला तेव्हा तिने रागाने पाहिलं. लगेचच अंकिताने “काय करत होतास?” म्हणून विचारलं. विकी स्पष्टीकरणं देणार तितक्यात तू गप्पच बस असं नजरेनच तिने म्हटलं.

आणखी वाचा – सहा दिवसांनंतरही करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार नाही, तिसरी बायकोही बेपत्ता अन्…

अंकिता व विकीचं हे छोटसं भांडण कॅमेऱ्यासमोर आलं. विकीचं वागणं अंकिताला पटलं नाही. यावर नेटकऱ्यांनीही कमेंटद्वारे विविध मतं मांडली आहेत. बायकोला कमी लेखून इतर मुलींना सतत जवळ करतो, बिचारी अंकिताने तिने बहुदा जोडीदाराविषयी वेगळा विचार केला असेल मात्र तिला काही वेगळंच मिळालं, अंकिता नेहमीच जळत असते, अंकिताला नवऱ्यावर खूपच अविश्वास आहे, बिचारा विकी कोणाला सांगूही शकत नाही अशा नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. अंकिताबरोबरच अनेकींनी विकीचीही बाजू घेतली.

Tags: ankita lokhandebollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
All is Well Marathi Movie Trailer

ATM ची चोरी, गुंडांची एंट्री अन्…; 'ऑल इज वेल'चा घोटाळा घालणारा ट्रेलर समोर, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डेच्या अभिनयाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.