शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ATM ची चोरी, गुंडांची एंट्री अन्…; ‘ऑल इज वेल’चा घोटाळा घालणारा ट्रेलर समोर, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डेच्या अभिनयाने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 17, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
All is Well Marathi Movie Trailer

ATM ची चोरी, गुंडांची एंट्री अन्…; 'ऑल इज वेल'चा घोटाळा घालणारा ट्रेलर समोर, प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डेच्या अभिनयाने वेधलं लक्ष

All is Well Marathi Movie Trailer : ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आला आहे. येत्या २७ जूनला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये येण्यास सज्ज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच एका दिमाखदार समारंभात प्रकाशित झाला. तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर इतर कलाकारांचा मजेशीर अंदाजही चित्रपटात पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं फूल्ल टू मनोरंजन करणारा हा चित्रपट नक्की बघा असं चित्रपटातील कलाकारांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

याप्रसंगी बोलताना निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर तसेच सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी म्हणाले की, काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो. प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल अशा कथानकाच्या शोधात असताना लेखक प्रियदर्शन जाधव, दिग्दर्शक योगेश जाधव आणि कार्यकारी निर्माते संजय ठुबे यांच्या सहकार्याने हा धमाल विषय आम्ही आणला आहे. सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी असून ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट मनोरंजनाची अफलातून ट्रीट असणार आहे असा विश्वास सर्व निर्मात्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक योगेश जाधव म्हणाले की, “एवढ्या कलाकारांसह एका वेगळ्या विषयाचा चित्रपट करता आला याचा खूप आनंद आहे. निखळ हास्याची मेजवानी देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरुन चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

आणखी वाचा – ९३ व्या वर्षी बायकोसाठी दागिना खरेदी करणारे आजोबा, सोनाराच्या दुकानात शिरताच…; डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर

प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर या अशा कलाकारांची जमून आलेली उत्तम भट्टी काहीतरी धमाल घडवणार हे दाखवत आहे. प्रत्येक कलाकाराच्या सळसळत्या ऊर्जेचं दर्शन चित्रपटातून दिसणार आहे. ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत.

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

आणखी वाचा – Video : नवऱ्याने प्रियांका चोप्राच्या बहिणीचा हात पकडताच अंकिता लोखंडे भडकली, कॅमेऱ्यासमोरच रागाने पाहिलं अन्…

‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश,अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा किर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.

Tags: All Is Wellmarathi moviemarathi movie trailer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
amol bawdekar heart attack

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका, प्रकृती गंभीर तरी डॉक्टरांकडे मागितले तीन तास, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.