माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या सोईप्रमाणे गोड, आंबट, तिखट अगदी हवेतसे चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होतेच. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्याही आणि कितीही प्रकारचे प्रयत्न करु शकतो. असाच काहीसा अट्टहास पूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी केला. सुरेखा कुडाळामध्ये शुटिंग निमित्त होत्या. पण त्यांनी मिसळ खायची इच्छा झाली. ती प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठी सुरेखा यांनी भलामोठा प्रवास केला. सुरेखा सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली त्यात त्यांनी स्पेशल मिसळ खाण्यासाठी काय काय केलं हे पोस्ट शेअर करत सांगितलं. (Surekha kudachi reach in Kolhapur for fadtare missal)
सुरेखा या शुटिंगच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी प्रवास करत असतात. आताही त्या एका प्रोजेक्टच्या शुटिंगसाठी कुडाळामध्ये गेल्या होत्या. त्यांची शुटिंग संपल्यानंतर कुडाळ ते कोल्हापूर असा प्रवास त्यांनी केला. कारण त्यांना मिसळ खायची इच्छा झाली होती. कोल्हापूरातील फडतरे यांची प्रसिद्ध मिसळ खाण्यासाठी त्यांनी एवठा मोठा पल्ला गाठला. या प्रवासादरम्यानचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्या फोटोंना कॅप्शन देत सुरेखा लिहितात, ‘कुडाळला शूटिंग संपवून कोल्हापूरला आले ते थेट फडतरे मिसळ खायला. कोल्हापूरची ही मिसळ म्हणजे नाद करायचा नाय. २० मिनिटं थांबले पण शेवटी मिसळ खाऊनच बाहेर पडले’, असं लिहीत सुरेखा यांचा मिसळसाठी केलेला अट्टहास पूर्ण केला.
प्रत्येक ठिकाणची काहीना काही स्पेशलिटी असते. तशी कोल्हापूरची ‘फडतरे मिसळ’ हीदेखील झणझणीतपणासाठी प्रसिद्ध आहे. स्थानिक तर याचे दिवाने आहेत पण बाहेरून बरीच मंडळी, खवय्ये या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी येतात. तशा सुरेखा देखील मिसळ खाण्यासाठी कुडाळहून कोल्हापूरात आल्या. एवढंच नाही तर त्यांनी मिसळ खाण्यासाठी २० मिनिटं प्रतिक्षा केली.
सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंवर नेटकरीही कमेंट व लाईक करत त्यांचं कौतुक करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, ‘वा खूप छान, विशेष म्हणजे तुम्ही लाईन लावून मिसळ खाल्ली ग्रेट आहात’, असं लिहीत त्यांनी कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं की, ‘मॅडमजी, नाद खुळा, जबरदस्त’, अशी कमेंट केली आहे.