मराठी चित्रपट सृष्टीतील लाडके खलनायक अशी जेष्ठ अभिनेते निळू फुले यांची ओळख होती. असं म्हणतात त्याकाळी एखादी सामान्य स्त्री जर निळू फुलेंना समोर पहिले तर पळून जायची. हे सगळं घडायचं फक्त त्यांच्या अभिनयामुळे. निळू फुले यांच्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या सकारात्मक भूमिका आहेत. त्यांनी साकारलेल्या साऱ्या भूमिकांमध्ये खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. जेष्ठ सिनेअभिनेत्री उषा चव्हाण यांनी सुद्धा निळू फुले यांच्या सोबत काम केलं असून “निळू फुले:व्यक्ती कलाकार कार्यकर्ता” या पुस्तकात उषा चव्हाण यांनी निळू फुले यांचा एक किस्सा सांगितला आहे.(Nilu Phule Usha Chavan)
एका नाटकाच्या प्रयोगाला जात असताना भयंकर पाऊसात कलाकारांची गाडी अडकली बराच वेळ गाडी एका जागेवर थांबल्यामुळे कलाकारांना भूक लागली होती. आणि गर्भवती असल्यामुळे उषा चव्हाण यांना जरा जास्तच भूक लागलेली त्यावेळी त्या म्हणाल्या खूप कमी वयात लग्न झाल्यामुळे मी ही गोष्ट जास्त लोकांना सांगितली न्हवती पण निळू फुलेंना टी गोष्ट माहिती होती आणि त्यांनी उषा चव्हाण यांची ही तळमळ ओळखली. पुढे उषा चव्हाण यांनी सांगितले कि माझी आणि पोटात असणाऱ्या बाळाची भूक ओळखून निळू फुले भर पाऊसात गाडीतून उतरले आणि आजूबाजूच्या शेतात फिरून त्यांनी गाजारं आणून उषा यांना दिली आणि म्हणाले मी मुळात माळी आहे त्यामुळे मला चांगलंच माहिती आहे कि कोणी कधी काय खावं.
हे देखील वाचा- म्हणून मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायला ओरडले होते ऋषी कपूर…साधेपणानं राहणं ठरलं होत कारण

अशी झाली होती पहिली भेट
उषा चव्हाण आणि निळू फुले यांनी “लवंगी मिरची कोल्हापूरची” या लोकनाट्यात एकत्र काम केलं होतं. या नाटकाच्या निमित्ताने उषा चव्हाण या पहिल्यांदा निळू फुले यांना भेटल्या उषा सांगतात नाटकाची तालीम सुरु होण्याआधी त्यांना थोडं दडपण आलं होतं आणि भीती सुद्धा वाटत होती परंतु तालीम सुरु झाल्यानंतर त्या दोघांमध्ये चटकन सूर जुळून आले. उषा म्हणतात उषा आणि त्यांची अनेक वर्षांपासून ओळख आहे असं त्यांना वाटायचं. कारण निळू फुले हे कोणताही “मी” पणा नसणारे सरळ साधे कलाकार होते. त्यांच्या कडून उषा यांना खूप शिकायला मिळालं असं त्या सांगतात.
हे देखील वाचा- कॅमेरामॅन ने ‘तू पनवती आहेस’ म्हणून हिणवलं तरीही आज मानानं घेतलं जात नाव!
त्यांचं काम बघून उषा त्यांना विचारायच्या की तुम्ही किती सुंदर काम करता. तुमची डायलॉग बोलायची पद्धत खूप छान आहे. मला कधी असं जमेल असं त्यांनी विचारलं असता निळू फुले त्यांना बोलले का नाही जमणार बाबा? तुला तर सहज जमेल तुझ्यात गुण आहेत. त्यांच्या या उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी उषा चव्हाण यांचा आत्मविश्वास वाढला. निळू फुले आता जरी आपल्यात नसले तरी ते जिवंत राहतील त्याच्या आठवणींच्या रूपात….(Nilu Phule Usha Chavan)
