घरामध्ये स्वयंपाक करताना किती चपाती खाणार? असा प्रश्न हमखास विचारला जातो. सगळ्यांनी आपापला आकडा सांगितल्यानंतरच त्याप्रमाणे चपात्या बनवल्या जातात. जास्त चपात्या झाल्या तर त्या वाया जाऊ नयेत हे त्यामागील एक कारण असते. मात्र अशा चपात्या मोजून बनवू नयेत असे अनेकदा शास्त्र सांगते. यामुळे तुमच्या घरात आर्थिक अस्थिरता येते असं म्हंटलं जातं. आता आपण वास्तुशी असलेले नियम आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तसेच या सगळ्या सर्व गोष्टीमागे काय तथ्य असतं यामागील आपण वास्तव जाणून घेऊया. (vastu tips)
शास्त्रानुसार, चपाती बनवणे सूर्य, मंगळ, राहू ग्रह यांच्याशी संबंधित आहे. चपात्या मोजून सूर्य व मंगळ ग्रह कमजोर होतात. तसेच राहूचा नकारात्मक प्रभाव आयुष्यावर पडू शकतो. हे परिणाम होऊ नये यासाठी चपात्या बनवताना कधीही न मोजण्याचा सल्ला दिला जातो. तसेच चपाती बनवताना तुमचे तोंड पूर्व दिशेला असावे. त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला गॅस असू नये. या दिशेला बघून चपाती बनवणं शुभ मानले जात नाही.
त्याचप्रमाणे पहिली चपाती बनवल्यानंतर ती सगळ्यात आधी गाईला खायला घाला. गाईला चपाती खायला घातल्यास तुम्हाला पुण्य लागते. तसेच तुमचे मन शांत राहते आणि घरगुती वाददेखील टळतात. हिंदु धर्मामध्ये प्राणीमात्रांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गाईबरोबर कुत्र्याला चपाती खायला घाला. श्वानाला चपाती खायला दिल्याने पुण्य मिळते. श्वानाला चपाती खायला घातल्यास राहू, केतू व शनि ग्रहांची शांती होते.
त्याचप्रमाणे एकादशीला तांदूळ खाणे वर्ज्य मानले जाते. शरद पौर्णिमा, शीतलाष्टमी, नागपंचमी व घरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चपाती बनवली जात नाही. असे करणे अशुभ मानले जाते. जर एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर चपाती बनवली तर ते आरोग्यासाठी नुकसानदायक असते. तसेच मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळत नाही असेही म्हंटले जाते.