Sashank Ketkar On Mens Day : समाजातील पुरुषांच्या योगदानाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ साजरा केला जातो. कोणत्याही कुटुंबाच्या, समाजाच्या आणि राष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात पुरुषांची भूमिका महत्त्वाची असते. महिला सक्षमीकरणासाठी अधिक कल असला तरी पुरुषांच्या आरोग्याकडे आणि प्रगतीकडेही विशेष लक्ष दिलं जातं. कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी सर्वकाही त्याग करत नेहमीच पाठीशी उभ्या राहणाऱ्या पुरुषांसाठीचा एक दिवस म्हणून ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ जगभरात साजरा केला जातो. पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एका मराठमोळ्या अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ही पोस्ट करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बरेचदा सामाजिक मुद्द्यांमुळे शशांक चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. आजवर त्याने अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाला सगळ्यांचीची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. सध्या तो ‘मुरंबा’ या मालिकेमध्ये तो मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत आहे.
शशांकने आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त शेअर केलेली एक पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यांत शशांक पुरुषावर आधारित गाणं गुणगुणत साऱ्यांना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “आपल्या खांद्यावरच्या ओझ्यानं कितीही थकला असला तरी सदैव आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांसाठी धीरानं लढणाऱ्या सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा”, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आणखी वाचा – Video : “समृद्धी घर रिकामं होतंय”, ‘आई कुठे…’चा सेट रिकामा होताना पाहून कलाकार भावुक, व्हिडीओ व्हायरल
शशांकने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. काहींनी त्याच्या गाण्याचं कौतुक केलं आहे. तर काहींनी या व्हिडीओवर कमेंट करत आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. शशांकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.