Vastu tips for open kitchen : नवीन घर घेतल्यानंतर ती वास्तू कशापद्धतीने डिझाइन करायची यासाठी प्रत्येकजण धडपड करत असतो. इतकंच नव्हे तर वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू विचारपूर्वक आणली जाते. घरामधील सगळ्यांचाच मुख्यत्वे महिलांचा आवडता कोपरा म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघर सुंदर व स्वच्छ असलं की, मन अगदी प्रसन्न होतं. वास्तूशास्त्रामध्येही स्वयंपाक घर कसे असावे? याबाबत अनेक गोष्टी नमुद केलेल्या आहेत. तुम्हीही या गोष्टी जमेल तितक्या पद्धतीने फॉलो करु शकता. वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही बदल केले तर सुख-समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. पण हे नियम नक्की काय आहेत याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
पूर्वी काही घरातील स्वयंपाकघराच्या दाराला चौकट आणि दरवाजाही असायचा. जसजसं काळ बदलत गेला तसतसं स्वयंपाक घराबाबतीत संकल्पनाही बदलल्या. ओपन किचन ही संकल्पना नव्याने उदयाला आली. या संकल्पनेवर आता अधिक बारकाईने काम केले जात आहे. वास्तुशास्त्रात नियम स्वयंपाकघर कसे असावे? याबाबत अनेक टिप्स आहेत. आजकाल खुल्या स्वयंपाकघराची संकल्पना बरीच भारतीय कुटुंबांना आकर्षित करत आहे. त्यांच्यासाठी या टिप्स फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.
ओपन किचनसाठी खास टिप्स
जर तुमच्या घरातही ओपन किचन असेल आणि त्यात दाराची चौकट किंवा दरवाजा नसेल तर सर्वप्रथम खुल्या स्वयंपाकघरात दरवाजा बनवण्याचा प्रयत्न करा. दरवाजा बनवणे शक्य नसल्यास, स्वयंपाकघराचा भाग जिथे संपतो तिथे त्रिकोणी स्फटिक लटकवा. जर तुमच्या घरात ओपन किचन असेल तर दररोज किचनमध्ये कापूर लावा आणि स्वयंपाकघराच्या शेवटी भिंतीवर स्वस्तिक चिन्ह लावा.
उत्तर भागातील खुले स्वयंपाकघर करिअर, वाढ आणि संपत्ती या नवीन संधींवर प्रभाव टाकते. उत्तर-ईशान्य प्रदेश हा आरोग्याचा प्रदेश मानला जातो. या भागात ओपन किचन असल्यास आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. ओपन किचनसाठी तुम्ही काही सोप्या वास्तु टिप्स देखील फॉलो करू शकता. जसे की खुल्या किचनमध्ये नेहमी उत्तरेकडे तीक्ष्ण वस्तू ठेवा. किचनच्या मागच्या बाजूला काळे कापड लटकवा. स्वयंपाकघराचा दरवाजा पूर्व दिशेला उघडणारा बनवा आणि त्याच्या बाजूला खिडकी बनवा.
टीप – वरील दिलेल्या माहितीची ITSMAJJA पुष्टी करत नाही. तुम्ही तुमच्या ओळखीच्या वास्तुशास्त्रज्ञाकडून याबाबत माहिती घेऊ शकता.