Zapuk Zupuk Teaser Out Now : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने यंदा अक्षरशः धुमाकूळ घातला. सर्व पर्वांपैकी हे पर्व विशेष चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात केवळ कलाकारच नव्हे तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने तुफान राडा केला. हे पर्व चर्चेत असण्याचं आणखी एक कारण म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने त्याच्या हटके कलेने यंदाचं पर्व गाजवलं. इतकंच नाही तर ‘बिग बॉस’च्या विजेतेपदावर सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने नाव कोरलं आहे. विजेतेपद जिंकल्यानंतर सूरजचे विविध स्तरातून कौतुक करण्यात आले. त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफरदेखील मिळाल्या. सूरजच आजही बरंच कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सूरज चव्हाणचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर रील व्हिडीओ बनवत तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतो. इतकंच नाही तर सूरजची झलक पाहायलाही बरेचदा तुडुंब गर्दी पाहायला मिळाली आहे. आता तर सूरज छोट्या पडद्यानंतर मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं समोर आलं आहे. दिग्दर्शक व ‘कलर्स मराठी’ वाहिनीचे सर्वेसर्वा केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणसाठी केलेल्या एका घोषणेने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. केदार यांनी केलेल्या घोषणेमुळे सर्वच स्तरात सूरजचे कौतुक झाले. कारण केदार यांनी सूरजला चित्रपटाची ऑफर दिली.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री झाली आई, घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो केला शेअर
‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेवेळीच त्यांनी सूरजला चित्रपट ऑफर केला आणि यानंतर आता सूरजच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून लवकरच हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं समोर आलं आहे. केदार शिंदे दिग्दर्शित सूरज चव्हाण अभिनीत ‘झापूक झुपूक’ असे चित्रपटाचे नाव आहे. २५ एप्रिल पासून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच सूरजचा चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला होता. यानंतर आता सूरजच्या चित्रपटाच्या टिझरने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत.
‘झापूक झुपूक’ या चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर हवा केली आहे. विशेषतः सूरजच्या तोंडचे खास डायलॉग या टीझरची जमेची बाजू आहे. तर टीझरमध्ये पाहिल्याप्रमाणे सूरजच्या आयुष्यात आलेली ती स्त्री नेमकी कोण असणार याकडेही साऱ्यांचं लक्ष लागून राहील आहे. संपूर्ण चित्रपटात सूरजच्या जीवनशैलीबाबत भाष्य केलेलं दिसतंय. इतकंच नाही तर टिझर पाहताच नेटकऱ्यांनी कमेंट करत सूरजला पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे.