मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हृदयाचे ठोके कमी झाले, ८ दिवस आयसीयुमध्ये अन्..; उषा नाडकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, रुग्णालयात उपचार सुरु असताना…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 9, 2025 | 11:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Usha nadkarni in hospital

हृदयाचे ठोके कमी झाले, ८ दिवस आयसीयुमध्ये अन्..; उषा नाडकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, रुग्णालयात उपचार सुरु असताना...

मालिका, चित्रपटांमध्ये दमदार भूमिकांमधून खणखणीत आवाजात एन्ट्री करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे उषा नाडकर्णी. उषा यांनी आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. आजही वयाच्या ७९व्य वर्षी त्या तितक्याच जोमाने व उत्साहाने काम करतात. कलेच्या जोरावर त्यांनी पैसा, प्रसिद्धी मिळवली. मात्र खासगी आयुष्यात कायमच त्या एकट्या राहिल्या. आई-वडिलांचं छत्र हरपल्यानंतर उषा हिंमतीने उभ्या राहिल्या. मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं त्यानंतर तोही दुरावला. त्याचा संसार त्याने थाटला. भावाचा आधार त्यांना होता. मात्र वर्षभरापूर्वी त्याचंही निधन झालं. आता उषा यांना एकटेपणा खात आहे. तीन वर्षांपूर्वी त्या जवळपास आठ दिवस आयसीयुमध्ये होत्या. याचबाबत त्यांनी आता भाष्य केलं आहे. (Usha nadkarni in hospital)

सुमन म्युझिक मराठीला दिलेल्या मुलाखतीत उषा म्हणाल्या, “पैसे कमवता कमवता माणसं कमावणं हे महत्त्वाचं. फक्त पैसाच असून चालत नाही. मी कधीच कोणावर ओझं झाले नाही. मध्यंतरी मी रुग्णालयामध्ये होते. या घटनेला दोन ते तीन वर्ष झाली. रात्रीचा मला दम लागायचा नाही. पण अवस्थ होऊन मी उठून बसायचे. मग मी तोंडात पंप मारायचे. झोपताना माझ्या बाजूला पंप असतोच. पण त्यानेही काहीच होत नव्हतं”.

आणखी वाचा – शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करने नवऱ्यासह रुग्णालयातच साजरी केली ईद, सासऱ्यांकडून मिळाली खास भेट, अभिनेत्रीची तब्येत आता…

View this post on Instagram

A post shared by Usha Nadkarni???? (@usha__nadkarni)

“मग कधीतरी सकाळी सकाळी मला झोप लागायची. आंघोळ केली तर स्वतःचं अंगही पुसता यायचं नाही. खाली वाकता यायचं नाही. घरामध्ये मी फक्त खाली वाकूनच होते. भावाला मी फोन केला म्हटलं मला असं असं होत आहे. मग तो आला. भाऊ म्हणाला मालाडला तू शाह डॉक्टरांकडे ये. डॉक्टरांनी मला तपासलं आणि सांगितलं की, हिला आताच्या आता रुग्णालयात घेऊन जा. हृदयाचे ठोके हिचे बरोबर नाहीत असं डॉक्टर म्हणाले. त्यानंतर भावाने मला हिंदुजा रुग्णालयात नेलं”.

आणखी वाचा – लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, शाही लूकची चर्चा, आदिनाथ कोठारेसह केलंय काम…

“तिथे जवळ जवळ मी आठ दिवस आयसीयुमध्ये होते. भाऊही माझा वयाने सत्तरीच्या पुढचा होता. मी त्या सगळ्यांना म्हणायचे की, तुम्ही सगळ्यांनी कुणीही येऊ नका. इथे आया-मावशी वगैरे सगळे चांगले आहेत. मला रुग्णालयामध्ये झोप यायची नाही. कारण जागा बदलली की, मला झोपच यायची नाही”. उषा तेव्हा रुग्णालयातून सुखरुप घरी आल्या. मात्र त्यांनी स्वतःची काळजी स्वतःच घेतली. कोणावरही अवलंबून न राहता आयुष्यभर जगायचं हे त्यांनी ठरवूनच ठेवलं आहे.

Tags: bollywood newsentertainment newsUsha Nadkarni
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
shantanu gangane on Payment issue

"आता आवाज उठवण्याची वेळ…", 'पारू' फेम अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाला, "तक्रार नोंदवली तर काम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.