शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आता आवाज उठवण्याची वेळ…”, ‘पारू’ फेम अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाला, “तक्रार नोंदवली तर काम…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2025 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
shantanu gangane on Payment issue

"आता आवाज उठवण्याची वेळ…", 'पारू' फेम अभिनेत्याने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाला, "तक्रार नोंदवली तर काम…"

shantanu gangane on Payment issue : मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांची बरेचदा मानधन वेळेत न मिळण्यावरुन तक्रार असते. अशी बरीच कलाकार मंडळी आहेत जी यावर आवाज उठवतात. साधारण सहकलाकार यांत भरडले जातात. तर नायक, नायिकांची ही तक्रार सहसा कानावर येत नाही. मालिकांमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याचे मानधन हे ९० दिवसांनी मिळायची पद्धत आहे. अशाने ज्यांचे पोट केवळ अभिनयावर चालते त्यांना ही समस्या अधिक भेडसावते. केवळ कलाकारच नव्हे तर तंत्रज्ञ व इतर टीमबरोबरही हेच होतं. बरेचदा पाच-सहा महिने त्यांना मानधन दिलं जात नाही. या परिस्थितीत योग्य त्या वेळी कामाचा मोबदला मिळायला हवा असा हट्ट करत आता मालिकाविश्वातील एका अभिनेत्याने न्याय मिळवून द्यायला आवाज उठविला आहे. हा अभिनेता म्हणजे शंतनू गंगणे.

शंतनू गंगणे सध्या पारू या मालिकेत मोहन किर्लोस्कर ही भूमिका साकारत आहेत. अभिनेत्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे वेळच्या वेळी मानधन न मिळण्यावरुन भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “नमस्कार, मी शंतनू शिवाजीराव गंगणे, मराठी चित्रपट व टीव्ही कलाकार तसेच कार्यकारी निर्माता आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून एक अत्यंत गंभीर मुद्दा मांडत आहे. आपल्यापैकी अनेक कलाकार, तंत्रज्ञ, मेकअप आर्टिस्ट, डिझायनर यांना मानधनासाठी ९० दिवसांनंतरही साधारण १२० ते १५० दिवस वाट पाहावी लागते. ज्यांच्याकडे दुसरे उत्पन्न आहे ते सुदैवी; पण जे पूर्णपणे या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हा प्रकार भीषण आहे. अनेकवेळा त्यांना रक्कम कमी करुन घ्यावी लागते, तडजोड करावी लागते, किंवा तक्रार नोंदवली तर काम मिळेल की नाही ही भीती वाटते. याशिवाय काही कलाकारांना त्यांचं मानधन सुद्धा मिळत आहे. ही मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. आपण सगळ्यांनी आवाज उठवण्याची वेळ आली आहे”.

आणखी वाचा – चुकीच्या पद्धतीने खाद्यपदार्थ शिजवणं दीपिका कक्करला पडलं महागात?, लिव्हर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शिकार आणि…

View this post on Instagram

A post shared by Shantanu Vrushali Shivajirao Gangane (@shantanugangane)

पुढे त्याने म्हटलं आहे, “मालिकाविश्वातील कलाकारांच्या मदतीसाठी कोणतीही संघटना नाही. ९० दिवसांनी पैसे ही संकल्पना नेमकी कोणी सुरु केली याची मला खरंच कल्पना नाही. ९० दिवसांनीही अनेकांना पेमेंट मिळत नाही. भारत सरकारची जी मायक्रो बिझनेसची स्किम आहे. याअंतर्गत रजिस्टर झालेल्या कंपन्यांना चॅनेल ४५ दिवसांमध्ये पेमेंट करतं. मग निर्मात्यांना ४५ दिवसांमध्ये पैसे मिळूनही या कंपन्या कलाकारांना वेळेत पैसे का देत नाहीत? हे चुकीचं आहे. याच्याबद्दल मी आवाज उठवत आहे”.

आणखी वाचा – शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करने नवऱ्यासह रुग्णालयातच साजरी केली ईद, सासऱ्यांकडून मिळाली खास भेट, अभिनेत्रीची तब्येत आता…

अखेर त्याने म्हटलं आहे की, “आपलीही अशीच तक्रार असल्यास मला WhatsApp वर तुमची तक्रार माननीय सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नावे अर्ज करुन मला १८ जून पर्यंत पाठवावी किंवा माझ्याबरोबर यावे ही विनंती. (१८ जून नंतर माननीय मंत्री महोदय यांची वेळ घेऊन त्यांच्याकडे सर्वांच्या तक्रारी पोहोचवल्या जातील) अत्यंत महत्त्वाची विनंती ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी ही पोस्ट शेअर करावी. जेणेकरुन ही माहिती जास्तीत जास्त कलाकार तंत्रज्ञ आणि कामगारांपर्यंत पोहोचू शकेल, ज्यांच्याबरोबर अशा प्रकारचा अन्याय किंवा त्रास झाला आहे, त्यांना न्याय मिळेल. तुमचं नाव कुठे येणार नाही, याची मी ग्वाही देतो”, असं आवाहन शंतनूने मालिकाविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना केलं आहे.

आणखी वाचा – लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटामाटात लग्न, शाही लूकची चर्चा, आदिनाथ कोठारेसह केलंय काम…

शेवटी तो म्हणाला, “खरंतर आपण निर्मात्यांना पोशिंदा समजतो, पण तेच जर असं वागत असतील तर हे चुकीचं आहे. कदाचित या व्हिडीओनंतर मला काम मिळणं बंद होईल किंवा मला टाळलं जाईल, याची मला काळजी नाही. मी जर योग्य असेल तर आई तुळजाभवानी मला बळ देईल. माझे कलाकार, तंत्रज्ञ माझ्या पाठीशी उभे राहतील आणि हा जो चुकीचा प्रकार चालू आहे, त्याबद्दल आवाज उठवतील”.

Tags: paaru serialshantanu ganganetelevision actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Govinda wife sunita talk about his career

चार मित्रांमुळे गोविंदाचं करिअर फ्लॉप, फक्त वाह वाह करुन...; अभिनेत्याच्या पत्नीचे गंभीर आरोप, नेहमी वाद कारण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.