Urmila Matondkar At Diwali Party : दरवर्षीप्रमाणे यंदाही फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण बॉलिवूड कलाकार या दिवाळी पार्टीमध्ये एकत्र जमले होते. या दरम्यान सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सैफ अली खान यांसारखे काही सेलिब्रिटी दिसले नाहीत. उपस्थित कलाकारांनी पापराजींना पोजही दिलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी जेव्हा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर समोर आली तेव्हा तिने सगळी लाइमलाइट चोरली. अभिनेत्री सध्या तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. अशातच कॅमेरासमोर येताच उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आलेली दिसली.
खरे तर, उर्मिला मातोंडकरने तिचे आठ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा केल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. ती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेत असल्याचं समोर आलं. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मुंबई कोर्टातील एका सूत्राने ‘इटाइम्स’ला सांगितले होते की, उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता परंतु घटस्फोट परस्पर अटींवर होत नसल्याची माहिती आहे.
यानंतर आता ही अभिनेत्री मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत निळ्या रंगाच्या पारंपरिक लूकमध्ये दिसली होती. यावेळी अभिनेत्रीने गळ्यात मंगळसूत्र व कपाळी सिंदूर लावले नव्हते ही गोष्ट अनेकांनी हेरली. इतकंच नव्हे तर उर्मिलाच्या हातात एंगेजमेंट रिंगही नव्हती. त्यामुळे ती लोकांच्या नजरेत आली आणि तिची चर्चा रंगली. उर्मिलाचे हे व्हिडीओ इंटरनेटवर आले तेव्हा अनेकांनी तिचे खूप कौतुक केले. चाहत्यांनी अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला. पण काहींनी इंडस्ट्रीतील लग्न व घटस्फोटावर तोंडसुख घेतलेले पाहायला मिळाले.
उर्मिलाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, “ती म्हातारी होत नाही”. तर एकजण म्हणाला, ‘प्रत्येक पोशाखात ती चांगली दिसते”. एकजण म्हणाला, ‘त्यांचे लग्न कसे योग्य होते? आज लग्न, उद्या घटस्फोट”. तर एका नेटकऱ्याने, “तिचा नवरा चांगला होता”, असं म्हंटल आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार उर्मिलाने मोहसीनबरोबरचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळे होण्याचे कारण अद्याप समजले नसले तरी ते परस्पर संमतीने वेगळे होत नसल्याचंही समोर आलं आहे.