शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज चव्हाणला घर बांधून देण्यावरुन हिणवणाऱ्यांना अंकिता वालावलकरचं उत्तर, म्हणाली, “बाहेर आल्यानंतर कळालं की…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 23, 2024 | 12:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar commented on the building a house for Suraj Chavan.

अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणला घर बांधून देण्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाला. सूरज चव्हाणला ‘बिग बॉस’च्या घरात सर्वांनीच पहिल्या दिवसापासून सांभाळून घेतलं. शिक्षण कमी असल्याने सुरुवातीला सूरजला टास्क समजून घेण्यात अडचणी निर्माण व्हायच्या. पण, पंढरीनाथ व अंकिताने त्याला या काळात खंबीरपणे साथ दिली. अंकिता व पॅडी यांनी सूरजला गेम व टास्कपलीकडे जाऊन त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दलच्याही अनेक गोष्टी सांगितल्या आणि शिकवल्याही. यादरम्यान सूरजला नॉमिनेट केल्यामुळे अंकिता बऱ्याचदा ट्रोलही झाली. तसंच अंकिताने सूरजला घर बांधून देणार असल्याचे म्हटलं होतं आणि हा मुद्दाही चांगलाच गाजला होता. ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर येताच अंकिता सूरजला घर बांधून देणार का? याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा झाल्या होत्या. (Ankita Walawalkar on Suraj Chavan House)

त्यावर आता अंकिताने भाष्य केलं आहे. अंकिताने तिच्या युट्यूब चॅनेलद्वारे सूरज चव्हाणला घर बांधून देणार असल्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. याबद्दल अंकिता असं म्हणाली की, “सूरजच्या घराबद्दल सांगायचे झाले तर, सगळेजण मला म्हणत आहेत की, ताई तू या विषयावर बोललं पाहिजे. सूरजचं घर होणे किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला पहिल्या आठवड्यापासून माहीत होतं. तेव्हा मी त्याला असं म्हणाले होते की, आपण ‘बिग बॉस’मधून बाहेर गेल्यावर तुझं घर बांधून घेण्याची जबाबदारी माझी असेल. मी आणि माझी सोशल मीडियाची टीम मिळून तुझं हे घर बांधून देऊ. तेव्हा आम्हाला हे माहीत नव्हतं की, सूरजसाठी बाहेर किती लोक वेडे झाले आहेत. लोकांना तो किती आवडतो आणि लोक त्याच्यासाठी काहीही करु शकतात याची पुसटशीही कल्पना नव्हती”.

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

आणखी वाचा – “हवं तर टोल घ्या पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ट्रॅफिकला वैतागून पोस्ट, म्हणाली, “सकाळी सात वाजता…”

यापुढे ती असं म्हणाली की, “बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर मला असं कळलं की, या गोष्टीचा खूप बाऊ केला गेला. सारखं घर घर घर केलं गेलं. पण एका अर्थाने हे चांगलं झालं. कारण त्यामुळे अजित पवारांकडून घोषणा झाली की, त्याला 2BHK फ्लॅट देण्यात येणार आहे. यासाठी मी त्याच्या गावातील एका सुजाण व्यक्तीच्या संपर्कात आहे. तर आमच्या नात्याबद्दल बाऊ करण्याची काहीही गरज नाही. “आता ताई तू सूरजला घर बांधून देणार का?” असं मला विचारलं जात आहे. तर माझं म्हणणं आहे की, त्याला नक्की किती घरं हवी आहेत. त्याला ज्या घराचे वचन दिलं गेलं आहे, ते घर त्याला मिळावं यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. मी ते त्याला घर मिळवून देणार आहे. मला असं वाटतं की, सूरज हा असा व्यक्ती आहे ज्याला 2BHK वगैरे घराची गरज नाही. त्याच्यासाठी फक्त त्याच्या गावात घर असणं हेच महत्त्वाचं आहे”.

आणखी वाचा – ‘बाई वाड्यावर या…’वर कंटेट क्रिएटर्सने बनवला व्हिडीओ, निळू फुलेंची लेक भडकली, तर प्रसाद ओक म्हणाला, “यांची एवढीच कुवत…”

यापुढे अंकिताने असं म्हटलं आहे की, “बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर अशी वेळ आली होती की, त्याला एका दिवसात ३-४ घर मिळाली असती. लोक त्याला द्यायला तयार होते. ‘बिग बॉस’च्या घरात एक टास्क झाला होता, ज्यात मी माझ्या एका मित्राला त्याच्या घराविषयी बोलले होते. पण तेव्हा ते दाखवलं गेलं नाही. तेव्हा घरातील सर्वांना कळलं की, अंकिता सूरजला घर बांधून देणार आहे आणि त्याचा बाऊ बनवला गेला. त्यामुळे मी त्याला घर बांधून देण्याचा विषय सारखा बोलला गेला आणि मी सहानूभूती घेत आहे असं म्हटलं गेलं. त्याला अजित पवारांनी घोषणा केलेले घर मिळाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेन. यासाठी मी कायमच त्याच्या संपर्कात राहणार आहे. अर्थात त्याने मला यासाठी संपर्क केला पाहिजे”.

Tags: ankita walawalkarAnkita Walawalkar on Suraj Chavan Housebigg boss marathi 5Suraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
manish malhotra diwali party

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये कोण किती सुंदर दिसणार? यावरुन स्पर्धा, शाहरुख खानच्या लेकीवर भारी पडली रविना टंडनची मुलगी, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.