Abhishek Bachchan Praised Aishwarya Rai : बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडी अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय नेहमीच चर्चेत असलेले दिसले. अनेक दिवसांपासून ऐश्वर्या व अभिषेक यांचा घटस्फोट होत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. गेल्या काही दिवसांपासून अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, अभिषेक बच्चन व अभिनेत्री निम्रत कौरचे अफेअर आहे आणि त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अभिषेकचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिनेता निम्रतसमोर पत्नी ऐश्वर्याचे कौतुक करताना दिसत आहे. या व्हिडीओने या चर्चांना काहीसा पूर्णविराम दिला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन असं म्हणत आहे की, “माझी पत्नी या बाबतीत कमालीची आहे. ती माझ्यासाठी नेहमीच एक अद्भुत भावनिक आधार आहे. मी खूप भाग्यवान आहे, माझे संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर आहे. ऐश्वर्यासारखी जीवनसाथी मिळण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती व्यावसायिक पार्श्वभूमीतून आली आहे. ती सर्व काही व्यवस्थित समजली आहे. ती माझ्यापेक्षा थोडे जास्त दिवस हे व्यवसायात असल्याने आता ती अचूक काम करत आहे. त्यामुळे तिला जग माहीत आहे. तिने हे सर्व सहन केले आहे”.
True but where is the disrespect by Aishwarya???? Even Jaya Bachchan has praised Aishwarya for forgetting her star image and stand behind. Don't talk about your mom here who disrespect your nalla fatherpic.twitter.com/D37QuBTzBz https://t.co/SlcU2zgqKJ
— Empress Aishwarya Fan (@badass_aishfan) October 19, 2024
अभिषेक पुढे असं म्हणत आहे की, “तुमचा दिवस आव्हानांनी भरलेला असेल तर तुम्ही घरी आल्यावर छान वाटते आणि तुम्हाला हे देखील माहित असतं की कोणीतरी आहे जो समजून घेईल. ती अशी व्यक्ती आहे ज्याकडे मी नेहमीच पाहिले आहे. तिने तिच्या आयुष्यातील काही कठीण प्रसंगांवर मोठ्या सन्मानाने आणि कृपेने मात केली आहे. मला तिच्याबद्दल खरोखर कौतुक वाटते. कलाकार हा भावनिक असतो”.
आणखी वाचा – पूजा केली, हार घातला अन्…; सूरज चव्हाणला मिळाली गाडी, आनंद व्यक्त करत शेअर केले फोटो
पुढे तो म्हणत आहे की, “आपण खूप संवेदनशील असतो आणि कधी कधी आपल्याला आलेल्या संकटावर हल्ला करायचा असतो आणि आपला स्फोट होतो. मी तिला अशा संकटांशी लढताना पाहिलं आहे, ज्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे”. जेव्हा अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर त्यांच्या ‘दासवी’ चित्रपटाचे प्रमोशन करत होते, तेव्हाच हा व्हिडीओ आहे. यावेळी अभिषेकचे बोलणे ऐकून निम्रत हसताना दिसली.