शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना कपाळी सिंदूर, ना गळ्यात मंगळसूत्र; दिवाळी पार्टीत उर्मिला मातोंडकरवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा, घटस्फोटादरम्यानचे फोटो चर्चेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 23, 2024 | 12:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Urmila Matondkar At Diwali Party 

दिवाळी पार्टीत उर्मिला मातोंडकरवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा, घटस्फोटादरम्यानचे फोटो चर्चेत

Urmila Matondkar At Diwali Party : दरवर्षीप्रमाणे यंदाही फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण बॉलिवूड कलाकार या दिवाळी पार्टीमध्ये एकत्र जमले होते. या दरम्यान सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, सैफ अली खान यांसारखे काही सेलिब्रिटी दिसले नाहीत. उपस्थित कलाकारांनी पापराजींना पोजही दिलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी जेव्हा अभिनेत्री उर्मिला मातोंडकर समोर आली तेव्हा तिने सगळी लाइमलाइट चोरली. अभिनेत्री सध्या तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. अशातच कॅमेरासमोर येताच उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आलेली दिसली.

खरे तर, उर्मिला मातोंडकरने तिचे आठ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा केल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. ती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेत असल्याचं समोर आलं. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मुंबई कोर्टातील एका सूत्राने ‘इटाइम्स’ला सांगितले होते की, उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता परंतु घटस्फोट परस्पर अटींवर होत नसल्याची माहिती आहे.

आणखी वाचा – ‘बाई वाड्यावर या…’वर कंटेट क्रिएटर्सने बनवला व्हिडीओ, निळू फुलेंची लेक भडकली, तर प्रसाद ओक म्हणाला, “यांची एवढीच कुवत…”

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यानंतर आता ही अभिनेत्री मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत निळ्या रंगाच्या पारंपरिक लूकमध्ये दिसली होती. यावेळी अभिनेत्रीने गळ्यात मंगळसूत्र व कपाळी सिंदूर लावले नव्हते ही गोष्ट अनेकांनी हेरली. इतकंच नव्हे तर उर्मिलाच्या हातात एंगेजमेंट रिंगही नव्हती. त्यामुळे ती लोकांच्या नजरेत आली आणि तिची चर्चा रंगली. उर्मिलाचे हे व्हिडीओ इंटरनेटवर आले तेव्हा अनेकांनी तिचे खूप कौतुक केले. चाहत्यांनी अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला. पण काहींनी इंडस्ट्रीतील लग्न व घटस्फोटावर तोंडसुख घेतलेले पाहायला मिळाले.

आणखी वाचा – “तिच्याबद्दल खरोखर कौतुक वाटते”, निम्रत कौरसमोर अभिषेक बच्चनने केले होते ऐश्वर्या रायचे कौतुक, व्हिडीओ व्हायरल

उर्मिलाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, “ती म्हातारी होत नाही”. तर एकजण म्हणाला, ‘प्रत्येक पोशाखात ती चांगली दिसते”. एकजण म्हणाला, ‘त्यांचे लग्न कसे योग्य होते? आज लग्न, उद्या घटस्फोट”. तर एका नेटकऱ्याने, “तिचा नवरा चांगला होता”, असं म्हंटल आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार उर्मिलाने मोहसीनबरोबरचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळे होण्याचे कारण अद्याप समजले नसले तरी ते परस्पर संमतीने वेगळे होत नसल्याचंही समोर आलं आहे.

Tags: Urmila matondkarUrmila Matondkar and Mohsin Akhtar Mir DivorceUrmila Matondkar Divorce
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar commented on the building a house for Suraj Chavan.

सूरज चव्हाणला घर बांधून देण्यावरुन हिणवणाऱ्यांना अंकिता वालावलकरचं उत्तर, म्हणाली, "बाहेर आल्यानंतर कळालं की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.