अभिनेत्री उर्मिला कोठारेने आजवर नृत्यांगना अभिनेत्री म्हणून प्रत्येकाच्या मनात घर केलंच आहे. उर्मिलाने बऱ्याच वर्षांनी मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत उर्मिला मंजुळा सातारकर ही भूमिका साकारताना दिसतेय. उर्मिला सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते. तसेच अनेक रील्स बनवून ती इंस्टाग्रामवरून पोस्ट देखील करत असते, उर्मिलाचा चहातावर्गही खूप मोठा आहे. ती तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असेल. उर्मिलाने शेअर केलेल्या रील्स या गमतीशीर असतात, आणि प्रेक्षकांना पाहायलाही त्या आवडत.(Urmila Kothare Video Viral)
अशातच उर्मिलाने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय. यांत उर्मिला संस्कारावर भाष्य करताना दिसतेय. या व्हिडीओ ती बोलतेय, मै और मेरे संस्कार, अक्सर यु ही बाते आपस में करते रेहते है, की डिअर संस्कार अगर तुम ना होते तो मैने कितनों को बातो के जवाब दे दिये होते, अगर तुम ना होते तो कितनों को उनकी औकात दिखा दी होती और डिअर संस्कार अगर तूम ना होते तो मैने कितनों के मुंह तोड दिये होते, संस्कार. तिच्या या व्हिडीओने तिने संस्कारावर भाष्य करत कोणाला तरी समज दिलीय का असा प्रश्न पडतोय. उर्मिलाच्या या व्हिडिओवर सर्व कलाकार मंडळी हसले आहेत.
नेमकी उर्मिलाने कोणाला दिलीय समज (Urmila Kothare Video Viral)
उर्मिला तिची लेक जिजा सोबतचे ही बरेच व्हडिओ नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असते. कलाकारांच्या माय लेकीच्या जोड्या पाहणं हे चाहत्यांना नेहमीच आवडत. अशीच मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अशी मायलेकींची जोडी म्हणजे उर्मिला कोठारे आणि जिजा कोठारे. उर्मिला सोशल मीडियावर लेक जिजा सोबतचे नवनवीन फोटो नेहमीच शेअर करत असते. उर्मिला उत्कृष्ट नृत्यांगणा आहे हे सरावानेच माहित आहे. उर्मिला अनेकदा तिचे नृत्य करतानाचे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या व्हिडिओंना चाहतेही भरभरून दाद देत असतात. अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि तिची लेक जिजा कोठारे यांची जोडीही प्रेक्षकांना अधिक आवडते.(Urmila Kothare Video Viral)
हे देखील वाचा – अश्विनीने शेअर केली शाहीर साबळेंसोबतची खास आठवण
उर्मिलाने आदिनाथ कोठारे सोबत लग्नगाठ बांधली असून सध्या त्यांच्या नात्याला घेऊन चांगलीच चर्चा रंगलेली दिसतेय. आदिनाथ आणि उर्मिला यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चाना उधाण आलंय. आदिनाथने मध्यंतरी असं काहीच नाही आहे असं सांगितलं होत. मात्र आदिनाथ आणि उर्मिला कुठेही एकत्र दिसत नसल्याने प्रेक्षकांमध्ये चर्चेचं वातावरण पसरलंय.
