शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आणि म्हणून माझ्या घरी त्यांचं येणं राहून गेलं..’ म्हणत मिलिंद गवळी झाले भावुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 27, 2023 | 8:43 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Milind Gawali post viral

Milind Gawali post viral

बरेच कलाकार हे त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात. अभिनयामुळेच ते लोकप्रियता ही मिळवतात. अशातच या कलाकारांचा सोशल मीडियावरील वावर ही प्रेक्षक लक्ष ठेवून असतात. हे कलाकार सोशल मीडियावर काही ना काही आठवणी शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी नेहमीच सोशल मीडियावर आठवणींना उजाळा देत असतो. त्यांच्यासोबत घडलेले त्यांचे किस्से, त्यांच्या आठवणी ते नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असतात. अशातच वक्त से पेहले या चित्रपटादरम्यानची एक आठवण मिलिंद गवळींनी पोस्ट केली आहे.(Milind Gawali post viral)

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय,  गायक नितीन मुकेश. यांनी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी माझ्यासाठी पार्श्वगायन केलं होतं चित्रपटाचे नाव होतं “वक्त से पहिले” या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं गोविंद सरय्या यांनी, गोविंद सरय्या म्हणजे ज्यांनी नूतनचा golden jubilee सिनेमा सरस्वतीचंद्र दिग्दर्शित केला होता, मला त्यांनी “ वक्त से पहले “या चित्रपटासाठी नायक म्हणून निवडलं होतं, या चित्रपटाची नायिका होती जयंत सावरकर यांची कन्या सुपर्णा , या चित्रपटांत पल्लवी जोशी आणि निवेदिता सराफ सुद्धा नायिकेसाठी consider केल्या होत्या, तो काळ होता 1984 चा, सगळ्यांचीच सुरुवात होती, 

मिलिंद गवळी रमलेत चित्रपटाच्या आठवणीत (Milind Gawali post viral)

श्रेष्ठ गायक मुकेश यांचा चिरंजीव नितीन मुकेश याला गोविंद सर यांनी त्या गाणं गायची संधी दिली होती, “वक्त से पहले “या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या चित्रपटांमध्ये मराठीचे दिग्गज हिरो “अरुण सरनाईक” हे सुद्धा काम करत होते. लहानपणापासून त्यांना बघत बघत आम्ही मोठे झालो होतो, त्यांनी गायलेलं “पप्पा सांगा कोणाचे मम्मी सांगा कोणाची” प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्यासह हे गाणं अजूनही तितकच मधुर आणि फ्रेश nostalgic वाटतं, काल “ तेजाब “मधलं नितीन मुकेश यांचं गाणं कानावर पडलं, आणि “ वक्त से पहले “से दिवस आठवले, नितीन मुकेश आठवला , अरुण सरनाईक आठवले ,गोविंद सर आठवले.(Milind Gawali post viral)

हे देखील वाचा – डिअर ‘संस्कार’, ‘अगर तुम ना होते तो..’ म्हणत उर्मिलाने दिली समज

अरुण सरनाईकांचे १६ जून १९८४ चे त्यांचे ते शब्द आठवले की “ राजा पुढच्या आठवड्यात कोल्हापूर वरून मुंबईत येणार आहे तेव्हा मी तुझ्या घरी नक्की येतो “ आणि 21 जून 1984 ला पंढरीची वारी शूटिंग करण्यासाठी कोल्हापूर वरून पुण्याला येत असताना त्यांच्या गाडीचा एक्सीडेंट झाला, यांत त्यांची पत्नी आणि मुलगा गेले. आणि माझ्या घरी त्यांचं येन राहून गेल. आयुष्यामध्ये फक्त आठवणी मागे राहतात, ज्या वेळेला आपण जुनी गाणी ऐकतो , तेव्हा त्या गाण्याबरोबर अनेक आठवणी जाग्या होतात. (Milind Gawali post viral)

मिलिंद गवळी यांच्या त्या चित्रपटादरम्यानच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत आणि त्यांनी त्या आठवणी सोशल मीडियावरून शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय. 

Tags: aai kuthe kaay karteaai kuthe kay kartebollywoodbollywood movieentertainmentits majjamarathi malikamarathi moviemarathi serialmilind gawalinew postvakt se pehlewaqt se pehle
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Laxmi Malhar

साईशा झाली मल्हारची नवीन हेअरस्टाईलीश,व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.