कलाकारांच्या मायलेकींच्या जोड्या ह्या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबाबत, त्यांच्या कटुंबाबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. अशातच अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि तिची लेक जिजा कोठारे यांची जोडीही प्रेक्षकांना अधिक आवडते. उर्मिला जिजासोबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. (Urmila Kothare Jija Kothare)
पहा उर्मिला आणि जिजाची केमिस्ट्री (Urmila Kothare Jija Kothare)
चाहतेही त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. आईप्रमाणेच जिजाही चु चुलबुली आणि ऍक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. एकत्र फोटोशूट आणि डान्स करतानाचे व्हिडीओ उर्मिलाने इंस्टाग्राम अकाऊंटवरून नेहमीच शेअर केलेले असतात.

अशातच उर्मिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यांत उर्मिला जिजा आणि स्वरा सोबतच दंगामस्ती करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यांत उर्मिला आणि स्वरा यांच्या टेम्पोमधल्या सीन शूटदरम्यान ते धमाल करताना दिसतायत. जिजाही आईसोबत सेटवर आलीय आणि ब्रेक मध्ये ते टेम्पोवर चढून मस्ती करताना दिसतायत. या व्हिडिओला उर्मिलाने both my daughters chilling on set असं कॅप्शन देत हा धमाल व्हडिओ शेअर केला आहे. तुझेच मी गीत गात आहे मालिकेत उर्मिला आपल्याला मंजुळा सातारकर या भूमिकेत पाहायला मिळतेय. अवनी तायवाडे स्वराच्या भूमिकेत दिसतेय.(Urmila Kothare Jija Kothare)
हे देखील वाचा – अभिनेत्री पूजा सावंतचा नवा प्रोजेक्ट येतोय लवकरच
उर्मिला आणि जिजा अधूनमधून सेटवर येत असतातच. याबाबतचे बरेच व्हिडीओ उर्मिलाने शेअर केल्या आहेत. ही मायलेकींची केमिस्ट्रीही नेहमीच लोकप्रियता मिळवते. तुझेच मी गीत गात आहे मालिकेत उर्मिला कोठारेने तब्बल १० वर्षांनी कमबॅक केलं मात्र मालिकेच्या कथेच्या गरजेनुसार तिला अल्पावधीतच मालिकेतून एक्सिट घ्यावी लागली. असे असताना आता मात्र पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून तिने मालिकेत कमबॅक केलंय. आता ती मालिकेत मंजुळा सातारकर ही भूमिका साकारतेय. या मालिकेतील बालकलाकार अवनी म्हणजेच स्वराजच्या आईच्या भूमिकेत आपल्याला उर्मिला पाहायला मिळाली होती.
