शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उदित नारायण यांच्या किसिंग व्हिडीओनंतर लेक आदित्य नारायणने लपवलं तोंड, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “असं काम केल्यावर…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2025 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aditya Narayan trolled

महिला चाहतीला किस दिल्यानंतर उदित नारायण यांचा मुलगा आदित्य सोशल मीडियावर ट्रोल

आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवूडला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक म्हणजे उदित नारायण गेल्या काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आहेत. हे कारण म्हणजे त्यांनी लाईव्ह शो दरम्यान महिला चाहतीला केलेला किस. गायक उदित नारायण लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका महिला चाहत्याला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि यामुळे सध्या ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झाले. त्यानंतर आता त्यांचा मुलगा आदित्य नारायण सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नुकताच आदित्य नारायण मुंबई विमानतळार स्पॉट झाला. यावेळी त्याने मास्क, चष्मा आणि टोपी घालत स्वत:चा चेहरा लपवला होता. (Aditya Narayan trolled)

आदित्य नारायणचा हा लूक बघून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. आदित्य नारायण ८ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी त्याने साधा पोशाख परिधान केला होता. पण मास्क आणि चष्माही घातल्यामुळे, तसंच मुंबईत थंडी फारशी नसतानाही त्याने डोक्यावर हिवाळ्याची टोपी घातली होती. यावेळी त्याने पापाराझींसमोर फक्त हाताने इशारा केला आणि तो निघून गेला. त्याच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यावर नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये प्रमोशनसाठी पोहोचला विकी कौशल, रेश्मा शिंदे भारावली, म्हणाली, “तुमच्याबरोबर काम करताना…”

आदित्यला पाहून एका युजरने उदित नारायण यांच्यावर निशाणा साधत असं म्हटलं आहे की, “काम असं करा की, मुलाला तोंड झाकून बाहेर पडावे लागेल.’ तर आणखी एकाने कमेंट केली आहे की, “वडिलांच्या किसचा परिणाम”. तर आणखी एका नेटकऱ्याने “स्वत:च्या नावाचा गौरव देण्यात वडील मुलापेक्षा पुढे आहेत”. याशिवाय अनेकांनी आदित्यने तोंड लपवल्याबद्दल उपरोधिकपणे भाष्य केलं आहे आणि या व्हिडीओवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  

आणखी वाचा – बायकोसाठी फोटोग्राफर बनला कुशल बद्रिके, एका क्लिकसाठी मागे मागे फिरत राहिला अन्..; धमाल व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गायक उदित नारायण ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर परफॉर्म करत असताना एक महिला फॅन त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी स्टेजजवळ आली होती. तेव्हा फोटो काढून होताच गायक तिच्या ओठांवर किस करतात. हा किसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल झाला आणि व्हिडीओ व्हायरल होताच गदारोळ झाला.

Tags: Aditya NarayanAditya Narayan trolledaditya narayan viral video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amitabh Bachchan tyed little girl shoelaces

Video : …अन् अमिताभ बच्चन यांनी त्या मुलीच्या शूजची बांधली लेस, प्रेक्षकांककडून भरभरुन कौतुक, म्हणाले, "इतका साधेपणा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.