बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी छावा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती आणि अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या या चित्रपटासाठी विकी कसून प्रमोशन करत आहे. याच प्रमोशनच्या निमित्ताने विकी एका लोकप्रिय मालिकेत येणार आहे, ही लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’. विक्की कौशलने ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने ‘घरोघरी मातीच्या चुली’च्या सेटवर खास हजेरी लावली. याचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Vicky Kaushal on Ghroghari Matichya Chuli set)
मालिकेतील मुख्य कलाकार अभिनेत्री रेश्मा शिंदे व सुमित पुसावळे यांनी विकीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. रेश्माने विकीबरोबरचा फोटो शेअर करत “विकी कौशल एक नम्र आणि प्रतिभावान अभिनेता. तुमच्याबरोबर काम करण्याचा खूप चांगला अनुभव होता. तुमच्याबरोबर पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे” अशा आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत. तर सुमितने असं म्हटलं आहे की, “विकी कौशल या प्रतिभावान, नम्र आणि दयाळू अभिनेत्याबरोबर एक आश्चर्यकारक भेट झाली. विकी कौशल खरोखरच एक प्रेरणा आहे”.
आणखी वाचा – विकी कौशलने कतरीना कैफची नाना पाटेकरांशी केली तुलना?, म्हणाला, “कंट्रोल उदय…”
सध्या मालिकेत ‘श्री आणि सौ’ ही स्पर्धा रंगली आहे. यावेळी विकीबरोबर मालिकेतले जानकी-ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली. ‘खेळ असो वा लढाई… कधीच हिंमत हारायची नाही! जिंकायचं असेल तर गनिमीकाव्याचा वापर करायला शिकलं पाहिजे. लढाई आपल्या माणसांच्या भरवशावर लढली जाते आणि नवरा-बायकोपेक्षा चांगली टीम दुसरी कुठलीच नाही. जिद्दीनं लढा, विजय निश्चित आहे!’ असा कानमंत्र यावेळी विकीनं जानकी-ऋषिकेशला दिला.
आणखी वाचा – बायकोसाठी फोटोग्राफर बनला कुशल बद्रिके, एका क्लिकसाठी मागे मागे फिरत राहिला अन्..; धमाल व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, विकी कौशल सध्या आगामी ‘छावा’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चाहते मंडळी चांगलेच उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्यारबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता अक्षय खन्नादेखील आहेत. त्या १४ फेब्रुवारीला विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.