‘कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेली अनेक वर्षे अमिताभ बच्चन हे या शोचे सूत्रसंचालक म्हणून समोर येत आहेत. आता या कार्यक्रमाचा १६ वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणारे स्पर्धक बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी भरभरून बोलतात. खेळ सुरु असताना महानायक यांच्याबरोबर रंगणाऱ्या गप्पा ही या शोची खासियत आहे. अशातच नुकत्याच एका भागात अमिताभ यांनी आपल्या साध्या कृतीने अनेकांची मनं जिंकली आहेत. (Amitabh Bachchan tyed little girl shoelaces)
या शोमध्ये अलीकडे लहान मुलांना स्पर्धक म्हणून पाहिले जाते. या शो संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमधील बिग बी यांनी केलेल्या कृतीमुळे तर सर्वांचे मन जिंकले आहेच. पण लोक हॉट सीटवर बसलेल्या लहान मुलीच्या धाडसाचेदेखील कौतुक करत आहेत. कारण या शो मध्ये असं काहीतरी घडलं जे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती सीझन १६’ च्या ज्युनियर सेगमेंटमध्ये, एक मुलगी हॉट सीटवर बसून तिच्या बुटाचे लेस बांधत होती. मग अमिताभ त्यांच्या जागेवरून उठले आणि तिच्याकडे गेले आणि “शूजच्या लेस निघाल्या आहेत का?” असं विचारलं. यावर तिनेही होकार दिला. मग अमिताभ बच्चन यांनी तिला विचारले की, “तुम्ही ते बांधाल की कोणाला तरी बांधायला बोलावू की आम्ही स्वतः बांधू?” यावर ती मुलगी अमिताभ यांना तुम्ही बांधा असं म्हणते. मग अमिताभ स्वत: खाली वाकत लेस बांधतात. त्यांची ही कृती पाहून उपस्थित भारावून जातात.
हा व्हिडीओ सोशल मीडियारव व्हायरल होताच अनेकांनी अमिताभ यांचे कौतुक केलं आहे. “अमिताभ बच्चन सर जी तुमच्या या स्वभावामुळे तुम्ही जगभर लोकप्रिय आहात”, “तुम्ही कोणाला लहान-मोठा मानत नाही, सगळ्यांना प्रेम देता, देव तुम्हाला सुखी ठेवो”, “याबद्दल तुम्हाला सलाम आणि प्रेम”, “किती गोड”, “सर तुम्ही खूप दयाळू आहात” या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.