आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या बॉलिवूडला मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक म्हणजे उदित नारायण गेल्या काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आहेत. हे कारण म्हणजे त्यांनी लाईव्ह शो दरम्यान महिला चाहतीला केलेला किस. गायक उदित नारायण लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका महिला चाहत्याला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि यामुळे सध्या ते सोशल मीडियावर टीकेचे धनी झाले. त्यानंतर आता त्यांचा मुलगा आदित्य नारायण सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नुकताच आदित्य नारायण मुंबई विमानतळार स्पॉट झाला. यावेळी त्याने मास्क, चष्मा आणि टोपी घालत स्वत:चा चेहरा लपवला होता. (Aditya Narayan trolled)
आदित्य नारायणचा हा लूक बघून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे. आदित्य नारायण ८ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी त्याने साधा पोशाख परिधान केला होता. पण मास्क आणि चष्माही घातल्यामुळे, तसंच मुंबईत थंडी फारशी नसतानाही त्याने डोक्यावर हिवाळ्याची टोपी घातली होती. यावेळी त्याने पापाराझींसमोर फक्त हाताने इशारा केला आणि तो निघून गेला. त्याच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यावर नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
आदित्यला पाहून एका युजरने उदित नारायण यांच्यावर निशाणा साधत असं म्हटलं आहे की, “काम असं करा की, मुलाला तोंड झाकून बाहेर पडावे लागेल.’ तर आणखी एकाने कमेंट केली आहे की, “वडिलांच्या किसचा परिणाम”. तर आणखी एका नेटकऱ्याने “स्वत:च्या नावाचा गौरव देण्यात वडील मुलापेक्षा पुढे आहेत”. याशिवाय अनेकांनी आदित्यने तोंड लपवल्याबद्दल उपरोधिकपणे भाष्य केलं आहे आणि या व्हिडीओवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा – बायकोसाठी फोटोग्राफर बनला कुशल बद्रिके, एका क्लिकसाठी मागे मागे फिरत राहिला अन्..; धमाल व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गायक उदित नारायण ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर परफॉर्म करत असताना एक महिला फॅन त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी स्टेजजवळ आली होती. तेव्हा फोटो काढून होताच गायक तिच्या ओठांवर किस करतात. हा किसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल झाला आणि व्हिडीओ व्हायरल होताच गदारोळ झाला.