शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बायकोसाठी फोटोग्राफर बनला कुशल बद्रिके, एका क्लिकसाठी मागे मागे फिरत राहिला अन्..; धमाल व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2025 | 11:08 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kushal Badrike Sunayana Photoshoot

बायको खास फोटोशूट केल्यानंतर कुशल बद्रिकेने व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या भावना

‘चला हवा येऊ द्या’ फेम मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा पडद्यावर जितका विनोदी आहे, तितकाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यातदेखील गंमतीशीर आहे. त्याच्या या विनोदी स्वभावाचा प्रत्यय वेळोवेळी आलाच आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. या शोमधून विनोदी स्किट्स करत त्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. कुशल हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. या फोटो किंवा व्हिडीओखखालील कुशलचे कॅप्शन्सही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. (Kushal Badrike Sunayana Photoshoot)

कुशलचा सुनयनाबरोबर प्रेमविवाह झाला असून त्यांच्यात नवरा-बायकोपेक्षा अधिक मित्र-मैत्रिणीचं नातं पाहायला मिळतं. कुशल आपल्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने पत्नीच्या एका खास फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुशल स्वत: त्याच्या पत्नीचे फोटो काढत आहे आणि हे खास फोटो काढण्यासाठी त्याने लेकाचीही मदत घेतली आहे. सूनयनाचे खास फोटो काढण्यासाठीची कुशल व त्याच्या लेकाची मेहनत या व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिवाय या फोटोशूटमागची भावना कुशलने कॅप्शनमध्ये शेअर केली आहे.   

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आणखी वाचा – विकी कौशलने कतरीना कैफची नाना पाटेकरांशी केली तुलना?, म्हणाला, “कंट्रोल उदय…”

कॅप्शनमध्ये कुशलने असं म्हटलं आहे की, “माणसाला आयुष्यात सुखाचा क्षण वेचता आला नाही तरी चालेल. पण बायकोने सांगितल्यावर तिचा छानसा फोटो मात्र खेचता आला पाहिजे. सुखाचा संसार हा आपल्या नशिबात असला तरी क्लिक होईलच असं नाही, ते बऱ्याचदा कॅमेऱ्यामध्ये केलेल्या क्लिकवरसुद्धा अबलंबून असतं. मला छान फोटो काढायला जमतील हा शोध माझ्या बायकोने लावला आहे. यावरुन असे सिद्ध होते की, बऱ्याचदा “भीती” सुद्धा शोधाची जननी असू शकते. आणि या निकषावर माझ्या मुलाचा संसारसुद्धा छान होईल असा फोटो माझ्या डोळ्यासमोर उभा राहत आहे”.

आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पहिला फोटो समोर

दरम्यान, कुशलने शेअर केलेल्या या खास व्हिडीओला चाहत्यांसह कलाकारांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अभिज्ञा भावे, सुकन्या मोने, फुलवा खामकर यांसारख्या अनेकांनी कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. अभिज्ञा भावेने हसण्याच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर सुकन्या मोने  यांनी “तुझी परी राणी तुझ्या नजरेतून आम्हाला गोड दिसली हो” अशी कमेंट केली आहे. शिवाय फुलवा खामकरांनी हार्ट इमोजी पोस्ट करत या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.   

Tags: Kushal Badrike Sunayana PhotoshootKushal Badrike wife SunayanaKushal Badrike wife Sunayana photoshoot video
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Amitabh Bachchan Cryptic Post

"जाण्याची वेळ झाली", अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा, चाहते अस्वस्थ, म्हणाले, "काय झाले सर?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.