Actress Kavita Chaudhary Passed Away : हिंदी मनोरंजन विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘उडान’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेतील मुख्य अभिनेत्री कविता चौधरी यांचे निधन झाले आहे. अमृतसरमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
कविता यांनी दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘उडान’ मालिकेत आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह ही भूमिका साकारली होती. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये कविता यांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्र व अभिनेते अनंत देसाई यांनी कविता यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

कविता या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अमृतसरमधील पार्वती देवी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, आज गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी शिवपुरी अमृतसरमध्ये अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, कविता यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना दु:ख झाले आहे. तसेच त्यांच्या निधनाच्या बातमीवर अनेक चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे आणि अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्यांच्या आत्यास शांती लाभो अशी प्रार्थनाही केली आहे.