बुधवार, ऑगस्ट 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारत गणेशपुरे, सागर कारंडेनंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील आणखी एक कलाकाराची हिंदी शोमध्ये वर्णी, प्रोमोने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 16, 2024 | 2:03 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Chala Hawa Yeu Dya fame actor Kushal Badrike will soon appear in a Hindi reality show

भारत गणेशपुरे, सागर कारंडेनंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील आणखी एक कलाकाराची हिंदी शोमध्ये वर्णी, प्रोमोने वेधलं लक्ष

गेल्या अनेक वर्षांपासून अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला भाग पाडणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या शोसह शोमधील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. शोमधील भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडेसह अंकुर वाढवे आणि अनेक कलाकारांना एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या शोमुळे अभिनेता कुशल बद्रिकेचे नशीब खऱ्या अर्थाने ऊजळलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी रिअ‍ॅलिटी शोने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. अशातच आता कुशल लवकरच एका शोमध्ये ही पाहायला मिळणार आहे. कुशल एका लोकप्रिय हिंदी चॅनेलवरील विनोदी शोमध्ये झळकणार असून या शोचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अनेक हिंदी कलाकारांसह मराठमोळा कुशल बद्रिकेही पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

आणखी वाचा – “आपण नालायक आहोत आणि…”, ताडोबाच्या जंगलात वाघ प्लास्टिक बॉटल उचलताना पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “लाज वाटते…”

कुशल लवकरच सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये कुशलसह अंकिता श्रीवास्तव, गौरव दुबे, केतन सिंग, पारितोष त्रिपाठी, स्नेहिल मेहरा व इंदर सहानी आदी कलाकारही पाहायला मिळत आहे. ‘मॅडनेस मचायेंगे’ हा शो सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’ची जागा घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

आणखी वाचा – लेकीच्या घटस्फोटाला हेमा मालिनी यांचा पाठिंबा, ईशा देओलचा १२ वर्षांचा संसार मोडल्यानंतर म्हणाल्या, “मुलीच्या निर्णयात…”

दरम्यान, मराठी कलाविश्व गाजवल्यानंतर कुशल आता हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. त्यामुळे तो आता या हिंदी शोमधून काय कमाल करणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच अनेकजण त्याच्या या नवीन शोसाठी खूपच उत्सुक आहेत.   

Tags: मनोरंजन बातमीमराठी बातमीकुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या फेमविनोदी अभिनेताविनोदी कार्यक्रमChala Hawa Yeu Diya Famecomediancomedy showentertainment newskushal badrikemarathi entertainment newsMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Munna Bhai Fame actor's Car Hits Two People
Entertainment

‘लगे राहो मुन्ना भाई’ फेम अभिनेत्याच्या कारची स्कूटरला धडक; दोन जण गंभीर जखमी

ऑगस्ट 18, 2026 | 2:05 pm
Govinda On Affair Rumours
Entertainment

“खरं प्रेम अस्तित्वात आहे का?”; कश्मीरा शाहच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष, म्हणाली, “लग्न, प्रेम…”

ऑगस्ट 17, 2026 | 5:59 pm
Manjar Movie Poster Onkar Bhojane in lead role
Entertainment

तीन मित्र अन् मोठा गोंधळ; ‘मांजर’ चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, १८ सप्टेंबरला उलगडणार…

ऑगस्ट 13, 2026 | 5:18 pm
Swara Bhasker breaks silence on being trolled
Entertainment

“मुस्लिमाशी लग्न करून तुम्ही लठ्ठ आणि कुरुप झालात का?”, ट्रोलिंगवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “सेक्सी मुली…”

ऑगस्ट 12, 2026 | 10:19 am
Next Post
Senior actress Jyoti Subhash s daughter amruta expressed her happiness by sharing a special video on receiving the award

Video : या वयातही अमृता सुभाषच्या आईचा उत्साह पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, गाडीमध्ये गाणं गाऊ लागल्या अन्...; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.