‘बिग बॉस १७’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खानच्या या शोमधून ‘बिग बॉस’चा किताब जिंकण्याच्या शर्यतीतून आतापर्यंत सहा स्पर्धक बाहेर झाले आहेत. या आठवड्यात आणखी एका स्पर्धकाचा पत्ता कट झाला आहे. या आठवड्यात चार स्पर्धक घरातून नॉमिनेटेड झाले होते. त्यात विकी जैन, नील भट्ट, अभिषेक कुमार व खानजादी उर्फ फिरोजा खान यांचा समावेश होता. मात्र शोमधून कोण बाहेर पडलं हे जाणून घ्यायला प्रेक्षक बरेच उत्सुक आहेत. तर नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार खानजादीचा या शोमधून पत्ता कट झाला आहे. (khanzadi aka firoza khan nominated)
मागील काही दिवसांपासून खानजादी घरी जाण्याचा हट्ट करत असल्याचं दिसून आलं होतं. यादरम्यान बऱ्याच वेळा तिला सलमानकडून चांगलंच खडसावलंही गेलं होतं. आता या कार्यक्रमातून तिला नॉमिनेट केलं गेलं आहे. विकी व अभिषेक यांना जास्त मतं मिळाली त्यामुळे ते दोघं नॉमिनेशनपासून सुरक्षित झाले होते. या सगळ्यात नॉमिनेटेड स्पर्धकांना बजर वाजवायचा होता. जो पहिला वाजवेल तो सुरक्षित होणार होता. पहिला बझर अभिषेकने वाजवला तर खानजादी शेवटी राहिली.
Exclusive ELIMINATION UPDATE
— The Khabri (@TheKhabriTweets) December 14, 2023
Contestan was eliminated based on a Buzzer task, Abhishek Pressed First and one last so he/she gets Eliminated from the house
‘बिग बॉस १७’ कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून खानजादी, अंकिता लोखंडे व मनारा चोपडासह इतर स्पर्धकांबरोबर असलेल्या वादांमुळे बरीच चर्चेत होती. पण मागील काही दिवस ती घरात शांत दिसली. अभिषेक कुमारबरोबर वाढत्या जवळीकतेमुळे ती चांगलीच चर्चेत राहिली. त्याचबरोबर तिची काही दिवसांपूर्वी प्रकृतीही बिघडली होती. त्यानंतर करण जोहरनेही तिला शोमध्ये चांगलंच सुनावलं होतं.
त्यानंतर तिने कार्यक्रमातून बाहेर जाण्याचा हट्ट करताना दिसली. त्यामुळे सलमानने तिला जायलाही सांगितलं होतं. आता तिचा या कार्यक्रमातून पत्ता कट झाला आहे. आता ‘बिग बॉस १७’च्या घरात १३ स्पर्धेक राहिले आहेत. त्यात मागील आठवड्यात या कार्यक्रमात कोरियन गायक औराची एंन्ट्री झाली होती.