‘कॉफ विथ करण’च्या ८ व्या पर्वाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. या पर्वाच्या नवीन भागात अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेता आदित्य रॉय कपूर यांनी हजेरी लावली. या शोमध्ये आलेल्या प्रत्येकालाच करण त्यांच्या रिलेशनशीपबाबत विचारताना दिसतो. या भागातही त्याने अर्जुन व आदित्यला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बऱ्याच गोष्टींबाबत जाणून घेतलं. त्यात त्याने अर्जुनला त्याच्या व अभिनेत्री मलायका अरोराच्या नात्याबाबत तसेच भविष्यातील नियोजनाबाबत प्रश्न विचारले. यावर उत्तर देत अर्जुनने स्पष्टीकरण दिलं आहे.(Arjun Kapoor talks about wedding with malaika arora)
करतच्या या चॅट शोच्या नवीन भागात अर्जुन, आदित्यने हजेरी लावत स्वतःच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींबाबत खुलासे केले. यावेळी करणने अभिनेत्यांच्या रिलेशनशीपबाबत खूप प्रश्न विचारले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला करणने अर्जुनला विचारलं, “तुम्हा दोघांचं (मलायका अरोडा-अर्जुन कपूर) नातं आता जगासमोर आलं आहे. तुम्ही एकमेकांबरोबर एकत्र आयुष्यही जगत आहात. मग आता तुम्ही तुमचं नातं अजून एक पाऊल पुढे(लग्न) घेऊन जाणार का?”. करणच्या या प्रश्नाचं उत्तर देत अर्जुनने सांगितलं की, “या गोष्टीवर मी एकट्याने मत मांडणं मलायकावर अन्याय केल्यासारखं होईल”.
अर्जुन पुढे सांगतो, “मला या कार्यक्रमात येऊन प्रामाणिकपणे उत्तरं देणं आवडेल. पण या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आता तयार नाही. मी इथे बसून मलायकाशिवाय आमच्या दोघांच्या भविष्यातील नियोजनाबाबत बोलणं चुकीचं ठरेल. जेव्हा आम्ही हा निर्णय घेऊ तेव्हा आम्ही दोघंही एकत्र यागोष्टीचा खुलासा करु. सध्यातरी आम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप खूश आहोत. आमच्या नात्याने आजवर बऱ्याच कठीण प्रसंगाचा सामना केला आहे. तरीही मी हेच बोलेन की, मी आमच्या नात्याबाबत एकट्याने बोलणं चुकीचं ठरेल”, असं सांगत त्याने मलायकाबरोबर लग्नाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं.
अर्जुनने या व्यतिरिक्त त्याच्या फ्लॉप चित्रपटांबाबतही वक्तव्य केलं. अर्जुनने याबाबत सांगिताना म्हणाला, “मी असा अभिनेता नाही ज्याने सुरुवातीपासूनच सुपरहिट चित्रपट दिले”. अर्जुनने एका ठिकाणी यश मिळवलं तर दुसऱ्या क्षणाला त्याने अपयशाचाही सामना केला. प्रत्येक अभिनेत्याच्या आयुष्यात हिट-फ्लॉप हा काळ असतो.