पडद्यावरील प्रेक्षकांना आवडणारी जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आली तर प्रेक्षक खूप खुश होतात. असे अनेक रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध जोडी हार्दिक जोशी व अक्षया देवधर हे त्यातील एक नाव. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून समोर आलेली ही जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली. दोघांची ही ऑनस्क्रीन लव्हस्टोरी प्रेक्षकांना जितकी भावली होती, तितकीच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा भावली होती. मालिका संपल्यानंतर चाहते त्यांना प्रचंड मिस करत होते. पण जेव्हा या जोडीने आपल्या लग्नाची घोषणा केली होती, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. (Akshaya Deodhar Mehandi Video)
मालिका संपल्यानंतर काही दिवसातच हार्दिक व अक्षया यांचा साखरपुडा झाला होता. २०२२ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले होते, याची चर्चा सगळीकडे झाली होती. लग्नानंतर ही जोडी त्यांचे अनेक फोटोज व व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करतात, ज्याची वारंवार चर्चा होत राहते. आता अक्षयाचा एक व्हिडिओ समोर असून हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – “जो भी होगा, देखा जायेगा,” संतुर जोडी नारकर कपलचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “नारकर साहेब…”
अभिनेत्री अक्षया देवधरची लग्नानंतर ही पहिली मंगळागौर आहे. त्यानिमित्ताने अक्षया व हार्दिकच्या घरी जोरदार तयारी सुरु आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अक्षयाने एक व्हिडिओ शेअर केला असून ज्यात तिच्या हातांना मेहंदी लावली जात आहे. हातांवर केलेले सुरेख नक्षीकाम, त्यावर दोन स्रोत आणि ‘अक्षयाची मंगळागौर’ असे लिहिण्यात आले आहे. तिच्या हातांवर करण्यात आलेली मेहंदी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अक्षयाचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून या व्हिडिओवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा – “बाळानंतर लैंगिक जीवनावर परिणाम?, नैसर्गिकरित्या गरोदर राहिलीस का?”, प्रश्नावर भडकली मराठमोळी अभिनेत्री, म्हणाली, “कोणी कसंही…”
अभिनेता हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांची जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दोघांनी जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतले होते. दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, हार्दिक सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे. अक्षया सध्या पडद्यावर दिसत नसली, तरी चाहते तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी आतुरलेले आहे. (Akshaya Deodhar Mehandi Video)