रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘गदर २’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, भयावह व्हिडीओ समोर

Ankita Shindeby Ankita Shinde
ऑगस्ट 28, 2023 | 3:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
man dies of heart attack in cinema hall

‘गदर २’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, भयावह व्हिडीओ समोर

सनी देओल व अमिषा पटेलचा ‘गदर २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर गर्दी करत आहेत. दरम्यान हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचलेल्या एका तरुणाबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘गदर २’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचलेल्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

उत्तर प्रदेशमधील एका चित्रपटगृहामध्ये ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील थिएटरमध्ये ३२ वर्षीय तरुण चित्रपट पाहण्यासाठी पोहोचला. फोनवर बोलत तो पायऱ्या चढत होता. दरम्यान पायऱ्या चढत असताना तरुण खाली कोसळला. यादरम्यानचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मृत तरुणाचं नाव अक्षत तिवारी असं आहे. अक्षत अचानक खाली कोसळल्यामुळे चित्रपटगृहामध्येही एकच गोंधळ उडाला.

आणखी वाचा – “दोघांचा प्रेमविवाह होता पण…”, आई-वडिलांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गश्मीर महाजनीचा मोठा खुलासा, म्हणाला, “दुर्देवाने फक्त तिनेच…”

शनिवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी ७.५०च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. अक्षतला खाली कोसळताना इतरांनी पाहिलं. दरम्यान त्याच्या मदतीसाठी उपस्थित धावून आले. तेथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक नायपाल सिंह यांनी या तरुणाच्या निधनाची संपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, “अक्षत तिवारीचा फोन अनलॉक होता. दरम्यान तेथील सुरक्षारक्षकांनी त्याच्या कुटुंबियांना फोन करुन या घटनेबाबत कळवलं. त्याला लगेचच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं”.

आणखी वाचा – Video : पाठकबाईंच्या पहिल्या मंगळागौरीचा थाट, हातावर राणादाच्या नावाच्या मेहंदीचा चढला रंग, व्हिडीओमध्ये दिसली झलक

लखीमपुर खीरी के फन मॉल में फिल्म देखने गये 32 वर्षीय अक्षत तिवारी की हार्ट अटैक आने पर हुई मौत। महेवागंज में रजत मेडिकल स्टोर के नाम से दवाई की दुकान चलाते थे अक्षत तिवारी। सदर कोतवाली के फन मॉल की घटना। pic.twitter.com/6QkaJHVbXK

— SANJAY TRIPATHI (@sanjayjourno) August 27, 2023

“दरम्यान रुग्णालयामध्ये नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सध्यातरी या संपूर्ण घटनेचा पोलीस तपास करत आहेत”. अक्षत रजत मेडिकल स्टोअर चालवायचा. त्याच्या निधनानंतर अक्षतच्या संपूर्ण कुटुंब कोलमडून गेलं आहे. सोशल मीडियावर या तरुणाच्या निधनाचं सीसीटिव्ही फुटेज व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

Tags: bollywood actorbollywood moviebollywood newssunny deol
Ankita Shinde

Ankita Shinde

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Jitendra Joshi shared a struggle story

"सात महिने हाती काम नाही, जेवणासाठीही पैसे नव्हते तेव्हा…", जितेंद्र जोशीने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला, "आईने मला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.