झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या जोडीनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)
चारुलताने सूर्यवंशांच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. मालिकेट नुकत्याच झालेल्या भागात अधिपतीने अक्षरासाठी खास भेटवस्तू घेतली. अधिपती भुवनेश्वरीच्या आठवणीत अक्षराला भुवनेश्वरीसारखे दागिने परिधान करायला सांगणार आहे आणि अक्षराही अधिपतीच्या सांगण्यावरुन भुवनेश्वरीसारखा लूक करते. अशातच आता मालिकेत आणखी एक नवीन ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे चारूलता व चारुहास यांच्या लग्नाचा.
आणखी वाचा – ना डिझाइनर कपडे, ना अवाढव्य खर्च; इतक्या साधेपणात केलं पृथ्वीक प्रतापने लग्न, साऊथ इंडियन स्टाइल लूकची चर्चा
मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्यातून मालिकेत लवकरच चारुहास व चारुलता यांचे लग्न पाहायला मिळणार आहे. पण यामुळे अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात दुरावा येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये चारुलता चारुहासला त्यांचे लग्न झाले आहे हे आठवत नसल्याचे सांगते. पुढे अक्षरा त्यांच्या लग्नासाठी अधिपतीकडे मदत मागते. पण अधिपती अक्षरालं नकार देत तुम्ही त्यांच्यात पडू नका असं म्हणतो. यावर अधिपती त्याचे ऐकणार नसल्याचे सांगते. पुढे अधिपतीही तिला या सगळ्यात मदत करणार नसल्याचे सांगते.
दरम्यान, आता चारुलता व चारुहास यांच्या लग्नामुळे अधिपती व अक्षरा यांच्या नात्यात काही दुरावा निर्माण होणार का? चारुलता व चारुहास यांच्या लग्नामुळे मालिकेला आणखी काय नवीन वळण येणार? हे लवकरच पाहायला मिळणार आहे. या प्रोमोखाली प्रेक्षकांनी आगामी भागासाठी उत्सुकता व्यक्त केली आहे.