बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Appi Aamchi Collector : अमोलच्या शाळेत गेले अप्पी-अर्जुन, सर्वोत्कृष्ट पालक स्पर्धेत सहभागही घेतला, जवळीक वाढणार

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 25, 2024 | 6:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Aamchi Collector zee Marathi serial update will Appi and Arjun win Amol school competition

Appi Aamchi Collector मालिकेत अखेर अमोलमुळे अप्पी-अर्जुन एकत्र, शाळेतल्या स्पर्धेत घेणार सहभाग

काही मालिका वेगळ्या कथानक, कलाकारांचा अभिनय यांमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करीत असतात. काही मालिका या सतत चर्चेत असतात. अशाच काही मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका आहे. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने तब्बल आठ वर्षांचा लीप घेतला होता. लीपपूर्वी सरकारनेच अर्जुनच्या आईचा खून केल्याचे सत्य सर्वांसमोर आलेले. विशेष म्हणजे हे सत्य अप्पीला माहिती असून सुद्धा तिने आपल्यापासून ते लपवलं यामुळे अर्जुनने तिच्यापासून दुरावा निर्माण केलेला. म्हणूनच ते दोघं वेगळे राहू लागलेले.  (Appi Aamchi Collector Serial Update)

अखेर आठ वर्षानंतर अप्पी तिचा मुलगा अमोलला घेऊन पुन्हा एकदा पुण्यात राहायला येते आणि मग अर्जुनची त्यांच्याशी भेट होते. अमोलमुळे अप्पी व अर्जुन एकमेकांबरोबर राहू लागतात, पण तरीही त्यांना एकमेकांच्या काही गोष्टी पटत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात सतत खटके उडत असतात. पण अमोल त्यांना सतत एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. नुकताच मालिकेत अमोलला आजार झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्याच्याकडे फक्त काहीच दिवस शिल्लक असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र तरीही अमोलने आपल्या आई-बाबांना एकत्र आणले. अशातच आता मालिकेच्या नवीन ट्विस्टबद्दल आणखी एक प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – चारुलता व चारुहासच्या लग्नासाठी अक्षराची धडपड, मात्र अधिपतीची नाराजी, दोघांमध्ये सुरु झाले वाद

या नवीन प्रोमोमध्ये सिंबाच्या (अमोल) शाळेत उत्तम पालकांची स्पर्धा होणार आहे, ज्यात मुलांच्या आवडी-निवडी जपणाऱ्या पालकांना ट्रॉफी मिळणार आहे. यावेळी सिंबाच्या शिक्षिका त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. यापैकी शिक्षिका त्यांना अमोलचा आवडता रंग विचारतात. तेव्हा अप्पी निळा असं उत्तर देते. त्यानंतर त्यांना अमोलचा आवडता खेळ विचारला जातो. तेव्हा अर्जुन क्रिकेट असं उत्तर देतो. पुढे अमोलचे सर्वात जास्त प्रेम कुणावर आहे असं विचारताच अप्पी असं म्हणते की, “त्याचं सगळ्यात जास्त प्रेम त्याच्या आई-बाबांवर आहे”.

आणखी वाचा – ना डिझाइनर कपडे, ना अवाढव्य खर्च; इतक्या साधेपणात केलं पृथ्वीक प्रतापने लग्न, साऊथ इंडियन स्टाइल लूकची चर्चा

या स्पर्धेत अप्पी व अर्जुन जिंकतील का? हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान, ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत नुकत्याच आलेल्या या नवीन ट्विस्टची गेले काही दिवस प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अप्पी व अर्जुन यांनी एकत्र यावे असे अनेक चाहते मंडळी म्हणत होते. अखेर चाहत्यांनी ही इच्छा पूर्ण होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

Tags: appi aamchi collectorAppi Aamchi Collector NewsMarathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
janhvi kapoor bridal look

जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाबरोबरच लग्न करणार?, बॉयफ्रेंडसह लाल लेहेंग्यामध्ये दिसली अभिनेत्री, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.