‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून अनेक नवोदित कलाकारांना प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करण्याची नवीन संधी मिळाली. हास्यजत्रेच्या माध्यमातून पृथ्वीक प्रताप हा अभिनेताही घराघरांत पोहोचला आहे. अभिनेत्याने नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे त्याने नुकतेच लग्न केले आहे. त्याने आपल्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पृथ्वीकने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हे नवीन फोटो शेअर केले आहेत. (Prithvik Pratap Marriage)
लग्नाचे सुंदर फोटो शेअर करत पृथ्वीकने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली असल्याचे जाहीर केलं आहे. लग्नाचे खास फोटो शेअर करत त्याने “२५-१०-२०२४… एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने.” असं सुंदर कॅप्शन लिहिलं आहे. पृथ्वीकच्या लग्नाचे फोटो पाहून इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अभिनेत्री श्रुती मराठे, अश्विनी महांगडे, प्रथमेश शिवलकर, अमृता खानविलकर, अक्षया नाईक, प्रथमेश परब, साक्षी गांधी, गौरी कुलकर्णी, स्वानंदी टीकेकर, सिद्धार्थ बोडके, गौरी नलावडे, अशा अनेक कलाकारांनी पृथ्वीकला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – वाढलेलं पोट, वजन, हाताला दुखापत अन्…; अभिषेक बच्चनची अशी अवस्था का?, फोटो व व्हिडीओ समोर
पृथ्वीकचे ही लग्नाचे फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोमध्ये पृथ्वीकने पांढरा कुर्ता व त्यावर धोतर आणि पायात मोजडी असा खास लूक आहे. तसंच या पेहरावावर त्याने मोगऱ्याच्या फुलांच्या वरमाळा परिधान केल्या आहेत. तसंच त्याची पत्नी प्राजका हिने ऑफ व्हाईट व सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे. तर या साडीवर गळ्यात सुंदर हार आणि कानात झुमके असे साजेसे दागिनेही परिधान केले आहेत. हातावरील मेहंदी व हिरव्या बांगड्यादेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पृथ्वीकने त्याच्या लग्नाचे तीन फोटो शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला असून या फोटोमध्ये पृथ्वीकच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेजे कॅमेऱ्याकडे बघून स्माईल केली असल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे प्रमाने बघत चालत येत असल्याचे दिसत आहे.