शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील गोंधळात अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न, मोठं संकट, अधिपतीची साथ मिळणार?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 12, 2024 | 4:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update new promo Akshara is being called crazy by her family

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराला वेडं ठरवण्याच्या प्रयत्न, या गोंधळातून स्वत:ला सोडवू शकेल का?

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. या मालिकेतील अधिपती व अक्षरा या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या जोडीनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कलाकारांचा अभिनय व मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांना ही मालिका भावते. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेत चारुलताची एन्ट्री झाली.  अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Update)

काही दिवसांपूर्वी चारुहासने भुवनेश्वरीला घराबाहेर काढले होते. अधिपतीसाठी भुवनेश्वरी खूप महत्त्वाची आहे. कारण- तिनेच त्याचा सांभाळ केला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका अपघातात अधिपतीची खरी आई चारुलताचे निधन झाले आहे, असे कुटुंबातील सर्व जण समजतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भुवनेश्वरी येते, जी चारुलतासारखी दिसते. आता चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर चारुलता अक्षराला सापडते. अक्षरा तिला घरी आणते. चारुहास आणि चारुलता यांच्यातील नाते पूर्वीसारखे व्हावे यासाठी अक्षरा त्यांचे पुन्हा एकदा लग्नदेखील करण्याची तयारी करीत असल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

 

आणखी वाचा – पोहायला गेला, एक तास थांबले, हाक मारुनही बघितलं नाही अन्…; अंकिताने समोर आणला सूरजचा खरा चेहरा, गावी गेल्यानंतर काय घडलं?

मात्र काही दिवसांपूर्वी अक्षराला चारुलताच भुवनेश्वरी असल्याचे वाटले. त्यानंतर तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर तिला वेडी ठरविण्यात आले. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यातून अक्षराचे म्हणणे कुणीच ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये चारुलता अक्षराला तिच्यावर कामाचा किंवा आणखी कशाचा तरी ताण आला आहे म्हणून ती वेड्यासारखी वागत आहे. अक्षराने हे मान्य केलं तरच आपण तिच्यावर काहीतरी इलाज करु शकतो” असं म्हणते. यानंतर चारूहास, आजी इतकंच नाही तर अधिपतीदेखील तिला वेडं ठरवतो. त्यामुळे आता अक्षरा यातु कशी बाहेर पडणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा – अशोक शिंदेंना ‘छावा’ चित्रपटाची होती ऑफर, भूमिकेसाठी दिला स्पष्ट नकार, म्हणाले, “नकारात्मक पात्र होतं आणि…”

दरम्यान, अक्षराने भुवनेश्वरी व चारुलता यांच्यातील फरक ओळखल्याने तिला आता गोंधळात टाकले जात आहे. त्यामुळे भुवनेश्वरीचा अक्षराला अडकवण्याचा डाव यशस्वी होणार का? यात अधिपतीची तिला साथ मिळणार का? आणि या सगळ्यातून अक्षरा कशी बाहेर पडणार? हे आगामी भागांमधुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: Marathi Serial NewsTula Shikvin Changalach Dhada Marathi Serial UpdatesTula Shikvin Changalach Dhada Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
दुसऱ्यांदा आई झाली सपना चौधरी, बारशाला हजारो लोकांची उपस्थिती, नाव आहे फारच खास

दुसऱ्यांदा आई झाली सपना चौधरी, बारशाला हजारो लोकांची उपस्थिती, नाव आहे फारच खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.