झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. या मालिकेतील अधिपती व अक्षरा या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या जोडीनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील कलाकारांचा अभिनय व मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांना ही मालिका भावते. अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेत चारुलताची एन्ट्री झाली. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. चारुहास-अक्षराने जरी चारुलताला स्वीकारलं असलं तरीही अधिपती काही केल्या तिला आई म्हणून स्वीकारण्यास तयार नसतो. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Update)
काही दिवसांपूर्वी चारुहासने भुवनेश्वरीला घराबाहेर काढले होते. अधिपतीसाठी भुवनेश्वरी खूप महत्त्वाची आहे. कारण- तिनेच त्याचा सांभाळ केला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका अपघातात अधिपतीची खरी आई चारुलताचे निधन झाले आहे, असे कुटुंबातील सर्व जण समजतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भुवनेश्वरी येते, जी चारुलतासारखी दिसते. आता चारुहासने भुवनेश्वरीला घरातून बाहेर काढल्यानंतर चारुलता अक्षराला सापडते. अक्षरा तिला घरी आणते. चारुहास आणि चारुलता यांच्यातील नाते पूर्वीसारखे व्हावे यासाठी अक्षरा त्यांचे पुन्हा एकदा लग्नदेखील करण्याची तयारी करीत असल्याचे पाहायला मिळाले.
मात्र काही दिवसांपूर्वी अक्षराला चारुलताच भुवनेश्वरी असल्याचे वाटले. त्यानंतर तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर तिला वेडी ठरविण्यात आले. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यातून अक्षराचे म्हणणे कुणीच ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये चारुलता अक्षराला तिच्यावर कामाचा किंवा आणखी कशाचा तरी ताण आला आहे म्हणून ती वेड्यासारखी वागत आहे. अक्षराने हे मान्य केलं तरच आपण तिच्यावर काहीतरी इलाज करु शकतो” असं म्हणते. यानंतर चारूहास, आजी इतकंच नाही तर अधिपतीदेखील तिला वेडं ठरवतो. त्यामुळे आता अक्षरा यातु कशी बाहेर पडणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा – अशोक शिंदेंना ‘छावा’ चित्रपटाची होती ऑफर, भूमिकेसाठी दिला स्पष्ट नकार, म्हणाले, “नकारात्मक पात्र होतं आणि…”
दरम्यान, अक्षराने भुवनेश्वरी व चारुलता यांच्यातील फरक ओळखल्याने तिला आता गोंधळात टाकले जात आहे. त्यामुळे भुवनेश्वरीचा अक्षराला अडकवण्याचा डाव यशस्वी होणार का? यात अधिपतीची तिला साथ मिळणार का? आणि या सगळ्यातून अक्षरा कशी बाहेर पडणार? हे आगामी भागांमधुन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.