‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे विजेतेपद जिंकल्यापासून गोलीगत सूरज चव्हाणच्या लोकप्रियतेत आणखीनच वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत ‘बिग बॉस मराठी ५’ मधील अनेक स्पर्धकांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांत इरीना व वैभव ही डीपी यांच्या गावी गेल्याचे पाहायला मिळाले. तसंच डीपी, वैभव, इरीना ही तिघे सूरजच्या गावी गेले होते. जान्हवीदेखील भाऊबीजसाठी सूरज चव्हाणच्या गावी गेली होती. अशातच आता अंकिता वालावलकरदेखील सूरजच्या गावी पोहोचली होती. अंकिता सूरजच्या गावी गेल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सूरजनेदेखील त्याच्या युट्यूब चॅनेलवर या भेटीचे काहे खास क्षण शेअर केले होते. अशातच आता अंकित वालावलकरनेदेखील सूरजच्या भेटीचा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. (Suraj Chavan Ankita Walawalkar Meet)
या व्हिडीओमधून तिने सूरजच्या गावी जाण्यापासून ते गावी त्याच्याबरोबर केलेल्या खास गप्पा, शेतीतील मजामस्ती, तसंच अंकिता व तिच्या होणाऱ्या नवऱ्याने सूरजच्या कुटुंबियांबरोबर साधलेल्या खास संवादाची झलक या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. यावेळी अंकिता सूरजच्या गावी पोहोचली असल्याचे तिने सूरजला सांगितले असूनही सूरज एक तास उशिराने येतो. सूरज पोहायला गेल्यामुळे अंकिता व कुणाल त्याची तब्बल एक तास वाट पाहतात. त्यानंतर सूरज एक तासाने पोहून येतो आणि त्यांना न भेटता थेट घरी जातो. यावेळी अंकिता सूरजला सादही देते. पण सूरज फक्त ‘नमस्कार’ म्हणत घरी निघून जातो. अंकिताने तिच्या या व्हिडीओमध्ये वेळेसहित सूरजबद्दल भाष्य केलं आहे. १ वाजून ३३ मिनिटांनी सूरज येतो, तेव्हा अंकिता त्याला सूरज’ अशी साद देते.
त्यानंतर १ वाजून ४१ मिनिटांनी सूरज अंकिता व कुणालची भेट घेतो. याबद्दल अंकिताने असं म्हटलं आहे की, “सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की, आम्ही सूरजला आधीच सांगितले होते की, आम्ही इथे पोहोचलो आहोत. त्यानंतर एक तास सूरज नव्हता. मग तो आला आणि आम्हाला न भेटताच तो घरात गेला. मग तो आम्हाला भेटला आणि हे सगळं जे आहे तो कुणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे करत आहे. हा तो सूरज नाही ज्याला मी ‘बिग बॉस’च्या घरात भेटले होते. त्याला इथे जसं सांगितलं जात आहे तसा तो वागत आहे आणि हेच दाखवण्यामागचे कारण आहे”.
आणखी वाचा – अरबाज-निक्कीनंतर छोटा पुढारी जान्हवी किल्लेकरच्या भेटीला, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “दाजींनी मला…”
दरम्यान, या व्हिडीओमध्ये अंकिताने सूरजच्या बदललेल्या वागणुकीबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. बिग बॉसच्या घरात असतानाचा सूरज व आता बिग बॉसच्या घराबाहेर आलेला सूरज यात फरक झाल्याचे तिने म्हटलं आहे. तसंच या व्हिडीओमधून तिने सूरजची ही वागणूक त्याच्या जवळच्या लोकांमुळे असल्याचेही म्हटलं आहे. त्याच्या काळजीपोटी मी अनेकदा बोलली आहे. पण आता मी बोलणं बंद केल्याचे तिने सांगितलं आहे. तसंच मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही तिने म्हटलं आहे आणि या सगळ्यावर ती आगामी व्लॉगमधून तिचे मत मांडणार आहे