Sapna Chaudhary Became A Mother : हरियाणवी डान्सर सपना चौधरी दुसऱ्यांदा आई झाली आहे. एका समारंभात सपना चौधरीच्या मुलाचे नाव ठेवण्यात आले असल्याचं समोर आलं. ११ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमादरम्यान, गायक बब्बू मानने सपना चौधरीच्या दुसऱ्या मुलाच्या नावाची घोषणा केली. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सपना चौधरीचा पती वीर साहू आणि पंजाबी गायक बब्बू मान स्टेजवर एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. या कार्यक्रमाला हजारो लोकांची गर्दीही पाहायला मिळत आहे.
सपना चौधरी आणि तिचा पती वीर साहू स्टेजवर बब्बू मानबरोबर उभे आहेत. यावेळी बब्बू मान आपल्या घरी आणखी एका छोट्या पाहुण्याचा जन्म झाल्याची घोषणा करताना दिसत आहे. ते पुढे म्हणतात, “वीर साहूला दुसरा मुलगा झाला आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव शाह वीर ठेवले आहे. हे ऐकताच तिथे उपस्थित सर्व लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली”.
रिपोर्ट्सनुसार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी वीर साहू आणि सपना चौधरी यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या नामकरणासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हरियाणवी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. सपनाच्या दुसऱ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी सामान्य जनताही कार्यक्रमाला पोहोचली.
चार वर्षांपूर्वी सपना चौधरीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. ज्याचे नाव तिने पोरस ठेवले. सपनाने तिच्या पहिल्या मुलाच्या किंवा दुसऱ्या मुलाच्या जन्मापूर्वी चाहत्यांना कोणतीही माहिती दिली नव्हती. सपना चौधरीनेही तिचे लग्न बरेच दिवस गुपित ठेवले होते. सपनाचा पती वीर साहू ‘आयी रसुख आला जात’ आणि ‘आह चक’ सारख्या गाण्यांसाठी ओळखला जातो.