शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपती अक्षरामधील गैरसमज अधिक वाढणार, भुवनेश्वरी ठरणार कारण, नवीन ट्विस्टवर प्रेक्षकही नाराज

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 24, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula shikvin changlach dhada serial update Bhuvaneshwari is going to increase the misunderstanding between Adhipati Akshara

भुवनेश्वरीमुळे अधिपती अक्षरामधील गैरसमज अधिक वाढणार, तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत नवीन ट्विस्ट

 ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अक्षरा, सूर्यवंशी कुटुंबाचं घर सोडून निघून गेल्याचे कथानक सुरु आहे. अक्षराला घराबाहेर काढायचं हा भुवनेश्वरीचा आधीपासूनच डाव असतो. फक्त ती योग्य संधीची वाट पाहत असते. ऐनवेळी बजरंग, अक्षरा विरोधात बोलल्यामुळे भुवनेश्वरी याच संधीचा फायदा करून घेते. अक्षरा-अधिपतीमध्ये भरल्या घरात भांडणं होतात. इतक्यात चिडलेला अधिपती “तुम्ही तुमचा निर्णय घ्या” असं बायकोला सांगतो. नवऱ्याचं हे मत ऐकून अक्षरा प्रचंड नाराज होते आणि घर सोडण्याचा निर्णय घेते. (tula shikvin changlach dhada serial update)

चारुहास सुनेला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण, अक्षरा आपल्या मतावर ठाम असते. याउलट अधिपती तिला अडवण्याचा प्रयत्न करत नाही. अक्षराला घराबाहेर काढल्यावर भुवनेश्वरी आणि तिची बहीण दुर्गेश्वरी या दोघींचा आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र, मास्तरीण बाई आता आई होणार असल्याचा नवीन ट्विस्ट आला आहे. भुवनेश्वरी अक्षरावर दमदाटी करत असतानाच दुर्गेश्वरी डॉक्टरांचे रिपोर्ट्स घेऊन येते आणि आपल्या ताईला म्हणते, “अगं ताई थांब. अधिपतीचं मूल अक्षराच्या पोटात वाढतंय, ताई ती गरोदर आहे.”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – प्रसिद्ध गायक शान यांच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?

हे ऐकताच आणि अक्षराचे रिपोर्ट्स पाहून भुवनेश्वरीला मोठा धक्का बसतो. त्यामुळे आता एकीकडे अक्षरा आई होणार आहे, तर दुसरीकडे अक्षरा-अधिपती यांच्या नात्यात दुरावा येणार आहे. मालिकेचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे आणि यात त्यांच्यातील गैरसमज दाखवण्यात आले आहेत. ज्यात अधिपती मोबाइल विसरल्यामुळे त्याला आलेला कॉल भुवनेश्वरी कट करते. तर अधिपतीही ती फोन उचलत नसल्यामुळे आता फोन करणार नाही असं म्हणतो. यावर अक्षरा माझा अधिपतीवर राग नाही पण मी भुवनेश्वरी मॅडम पुढे झुकणार नाही असं म्हणते.

आणखी वाचा – प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. “अधिक वाढले नाही तर तुमची सिरियल कशी चालणार…..नेमका अधिपती मोबाईल ठेवून जातो आणि तिचा फोन येतो….वा…काय मालिका”, “सतत कारस्थान, चोरून ऐकणं, पाठलाग, माणसं मागावर ठेवणं, काहीही प्लॅन”, “कथा पुढे जातच नाही  फक्त यांचे दुःख आणि दागिने बघण्यासाठी आपण झी मराठी बघायच का?” अशा कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे

Tags: marathi tv serialtula shikvin changlach dhadatula shikvin changlach dhada serial update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
ali asgar on television serial

अली असगरची छोट्या पडद्यावर पुन्हा एन्ट्री, वेगळ्याच रुपात दिसणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.