टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता अली असगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या खूप काळापासून ते टेलिव्हीजनपासून दूर असलेले बघायला मिळतात. त्यांनी टेलिव्हीजनपासून इतका दुरावा का निर्माण केला याबद्दल मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. आजवर ते अनेक टेलिव्हीजन मालिका, कार्यक्रम व अनेक हिंदी चित्रपटामध्ये भूमिका साकारताना दिसले. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. ‘कपिल शर्मा शो’मध्ये त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांच्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. नंतर मात्र ते गायब झाले. संपूर्ण देशभरात त्यांचे चाहते आहेत. खूप काळ टीव्हीवर न दिसल्याने ते पुन्हा कधी दिसणार याबद्दल चर्चा सुरु झाल्या. (ali asgar on television serial)
अशातच आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकर अली छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणार आहेत. अली यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच ते आता वागळे की दुनिया- नवीन पिढी नवीन किस्से’ या मालिकेत कॅमियो करताना दिसणार आहेत. त्यांनी सांगितले की, “मी वागळे की दुनिया या मालिकेमध्ये काम करणार आहे. यासाठी मी खूप खुश आहे. ही एक कल्ट क्लासिक आहे आणि चाहते याला खूप पसंत करत आहे. ही मालिका खूप भावनात्मक आहे. हरीश खन्ना असे माझ्या भूमिकेचे नाव आहे. तसेच स्टँडअप कॉमेडियन आहे. ही भूमिका प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मी आता नवीन एपिसोडसाठी वाट नाही बघू शकत”.
या मालिकेमध्ये सुमित राघवनदेखील दिसून येत आहे. सुमित म्हणाला की, “अली असगर एक खूप प्रभावशाली विनोदी अभिनेते आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेमध्ये माझी राजेश ही भूमिका आहे. राजेशचा लहानपणीचा मित्र म्हणून मी ही भूमिका साकारत आहे. अली यांचे टायमिंग कमालीचे आहे. राजेश व हरिश यांची लहानपणीची मैत्री काय जादू करणार हे आता पाहाण्यासारखे आहे”.
‘वागळे की दुनिया’ ही मालिका 2021 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामध्ये सुमित राघवन, परवा प्राणिती, अंजन श्रीवास्तव व इतर कलाकार दिसून येत आहेत. ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे.