‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अक्षरा, सूर्यवंशी कुटुंबाचं घर सोडून निघून गेल्याचे कथानक सुरु आहे. अक्षराला घराबाहेर काढायचं हा भुवनेश्वरीचा आधीपासूनच डाव असतो. फक्त ती योग्य संधीची वाट पाहत असते. ऐनवेळी बजरंग, अक्षरा विरोधात बोलल्यामुळे भुवनेश्वरी याच संधीचा फायदा करून घेते. अक्षरा-अधिपतीमध्ये भरल्या घरात भांडणं होतात. इतक्यात चिडलेला अधिपती “तुम्ही तुमचा निर्णय घ्या” असं बायकोला सांगतो. नवऱ्याचं हे मत ऐकून अक्षरा प्रचंड नाराज होते आणि घर सोडण्याचा निर्णय घेते. (tula shikvin changlach dhada serial update)
चारुहास सुनेला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण, अक्षरा आपल्या मतावर ठाम असते. याउलट अधिपती तिला अडवण्याचा प्रयत्न करत नाही. अक्षराला घराबाहेर काढल्यावर भुवनेश्वरी आणि तिची बहीण दुर्गेश्वरी या दोघींचा आनंद गगनात मावेनासा होतो. मात्र, मास्तरीण बाई आता आई होणार असल्याचा नवीन ट्विस्ट आला आहे. भुवनेश्वरी अक्षरावर दमदाटी करत असतानाच दुर्गेश्वरी डॉक्टरांचे रिपोर्ट्स घेऊन येते आणि आपल्या ताईला म्हणते, “अगं ताई थांब. अधिपतीचं मूल अक्षराच्या पोटात वाढतंय, ताई ती गरोदर आहे.”
आणखी वाचा – प्रसिद्ध गायक शान यांच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, नेमकं काय झालं?
हे ऐकताच आणि अक्षराचे रिपोर्ट्स पाहून भुवनेश्वरीला मोठा धक्का बसतो. त्यामुळे आता एकीकडे अक्षरा आई होणार आहे, तर दुसरीकडे अक्षरा-अधिपती यांच्या नात्यात दुरावा येणार आहे. मालिकेचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे आणि यात त्यांच्यातील गैरसमज दाखवण्यात आले आहेत. ज्यात अधिपती मोबाइल विसरल्यामुळे त्याला आलेला कॉल भुवनेश्वरी कट करते. तर अधिपतीही ती फोन उचलत नसल्यामुळे आता फोन करणार नाही असं म्हणतो. यावर अक्षरा माझा अधिपतीवर राग नाही पण मी भुवनेश्वरी मॅडम पुढे झुकणार नाही असं म्हणते.
मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. “अधिक वाढले नाही तर तुमची सिरियल कशी चालणार…..नेमका अधिपती मोबाईल ठेवून जातो आणि तिचा फोन येतो….वा…काय मालिका”, “सतत कारस्थान, चोरून ऐकणं, पाठलाग, माणसं मागावर ठेवणं, काहीही प्लॅन”, “कथा पुढे जातच नाही फक्त यांचे दुःख आणि दागिने बघण्यासाठी आपण झी मराठी बघायच का?” अशा कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे