शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changlach Dhada : भुवनेश्वरीचं सत्य समोर आणण्यात अक्षरा यशस्वी, तरीही लेकासाठी चारुहास लग्न करणार का?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 2, 2024 | 3:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial update Adhipati will ask Charuhas to marry Bhuvaneshwari even after knowing about her truth.

अधिपतीचे ऐकून चारुहास पुन्हा लग्नासाठी तयार होणार का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नवा ट्विस्ट,

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून चारुहास आणि चारुलता (भुवनेश्वरी) यांच्या लग्नाचा सीक्वेन्स सुरु असल्याचे पाहायला मिळालं. चंचलाकडून अक्षराला भुवनेश्वरी तिच्या गैरहजेरीत लग्न लावणार असल्याचे कळलं. त्यामुळे अक्षरा चारुहास व चारुलता (भुवणेश्वरी) यांचा लग्न थांबवण्याचा निर्णय घेते आणि यासाठी ती हॉस्पिटलमधून पळ काढते. हॉस्पिटलमधून बाहेर पडणे शक्य नसल्याने अक्षरा नर्सच्या वेषात बाहेर पडते. त्यानंतर अक्षरा थेट घरी येते आणि चारुहास व चारुलता यांचे लग्न मोडते. अशातच आता ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)

अक्षरामुळे भुवनेश्वरीच चारुलता आहे, हे सत्य सर्वांसमोर उघड होतं. त्यानंतरही भुवनेश्वरी स्वत:चा बचाव करते. “माझ्या जीवापेक्षा माझा लेक माझ्यासाठी जास्त प्रिय आहे. तुम्ही मला लाथाडलं पण मी अधिपतीसाठी इथे राहिली. तुम्ही झिडकारलंत तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले,” असं ती चारुहासला म्हणते. “माझं सर्व आयुष्य मी या घरासाठी खर्च केलं. या घरासाठी रक्ताचं पाणी केलं. आता तुम्हीच न्याय करा, माझी फसवणूक मोठी की माझं प्रेम?” असा सवाल ती सर्वांसमोर चारुहासला करते. त्यानंतर आता मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाची जय्यत तयारी, निसर्गरम्य वातावरणात Bride To Be Party, फोटो व्हायरल

या नवीन प्रोमोमध्ये अधिपती चारुहासला लग्न मान्य करण्यासाठी विनवणी करतांनाचे सांगत आहे. या प्रोमोमध्ये अधिपती वडिलांना असं म्हणतो की, “जे झालं ते झालं, आता सगळं विसरुन माफ करुया. तुमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी नाही, पण माझ्यासाठी तरी… तुमच्या मुलासाठी तरी हे लग्न मान्य करा. कृपया या लग्नाला तयार व्हा आणि चारुलताबरोबर (भुवनेश्वरी) लग्न करा. इतकं तरी माझ्यासाठी करु शकता ना?”

आणखी वाचा – चाळीशीमध्येच बाबा गेले, आईचं आजारपण अन्…; निवेदिता सराफांनी पहिल्यांदा सांगितली घरातील परिस्थिती, म्हणाल्या, “धक्का बसला…”

मालिकेचा हा नवीन प्रोमो व्हायरल होत असून आता मालिकेत चारुहास चारुलताच  भुवनेश्वरीच असल्याचे समजल्यानंतरही लग्न करण्यास तयार होणार का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत गेले काही दिवस चारुहास व अधिपती यांचे संबंध नीट नसल्याचे पाहायला मिळत नव्हते. त्यामुळे आता लेकाचे प्रेम मिळवण्यासाठी भुवनेश्वरीचे सत्य माहीत झाल्यानंतरही तिच्याबरोबर लग्न करणार का? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi tv serialtula shikvin changlach dhadatula shikvin changlach dhada serial update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame Ankita Walawalkar help for her friend's sister getting bed in KEM hospital.

…अन् त्या मुलीला बेड मिळवून देण्यासाठी केइएम रुग्णालयात पोहोचली अंकिता वालावलकर, रुग्णाचे नातेवाईक म्हणाले, "शब्द नाहीत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.