सध्या मराठी कलाविश्वात लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिषेक-सोनाली व रेश्मा शिंदे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता अभिनेत्री हेमल इंगळे व शाल्व-श्रेया हे कलाकारही लवकरच विवाहबंधनात अकडणार आहेत. अशातच आता आणखी एक मराठी अभिनेत्री आपली रेशीमगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस या अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता लवकरच ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे आणि आपल्या आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ मालिका फेम कौमुदी वलोकर. (kaumudi walokar bride to be party)
‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशची बायको आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच खऱ्या आयुष्यात लग्न करणार आहे. सध्या तिच्या केळवणाला सुरुवात झाली आहे. शूटिंग संपवून घरी आलेल्या लेकीचं तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रेमाने औक्षण केलं. केळवणासाठी कौमुदी पारंपरिक लूक करून तयार झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीसाठी अगदी साग्रसंगीत सर्व जेवण बनवलं होतं. त्यानंतर आता अभिनेत्रीच्या भावडांनी तिची बॅचलर पार्टी साजरी केली आहे. याबद्दल तिने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. बॅचलर पार्टीचे काही खास फोटो शेअर करत कौमुदीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या या टोळीबद्दल मी कायम कृतज्ञ आहे आणि हे माझ्या प्रत्येक स्वप्नाला मागे टाकणारे एक आश्चर्य आहे. “ताई ऐक ना, तू एक दिवसाची बॅग भर आणि आमच्याबरोबर चल” इथपासून झालेली सुरुवात “आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, हे सगळं तुझ्यासाठीच चाललं आहे” इथंपर्यंत येऊन पोहोचली आहे. जीवनाच्या गडबडीत माझ्या आत्म्याला काय हवे आहे? हे माझ्या बहिणी आणि भावांना माहित होते. गुलाबी जांभळा सूर्यास्त आकाश, थंड निळ्या तलावाचे पाणी, शांत बॅकवॉटरकडे जाणारी पायवाट, सर्व पर्वतांच्या भव्यतेने तयार केलेले. एक लाकडी कॉटेज, प्रेमाने झाडाच्या नावावर, निसर्गाच्या हृदयात पसरलेली शांतता आणि पुन्हा शांत माघार…”
यापुढे तिने “अशी आश्चर्यचकित पणे माझी बॅचलर पार्टी साजरी झाली. माझ्यासाठी हा एक अविस्मरणीय दिवस होता. निसर्ग, आश्चर्य आणि प्रेम – आणखी काय हवे आहे” असंही म्हटलं आहे. तिचे हे बॅचलर पार्टीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, कौमुदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘शाळा’ चित्रपटामधून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. तसेच छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत तिने साकारलेली आरोही प्रेक्षकांनासुद्धा भावली.