शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हनिमूनवरुन आल्यावर राडा होणार”, अक्षरा-अधिपतीचा हनिमून व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “दोघांचं नातं…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 24, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial honeymoon special video netizens expressed their mixed reactions know more

"हनिमूनवरुन आल्यावर राडा होणार", अक्षरा-अधिपतीचा हनिमून व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, "दोघांचं नातं..."

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा आहे, तर अक्षरा ही एका शाळेतील शिक्षिका आहे. मालिकेत अक्षरा-अधिपती यांच्या नवीन केमिस्ट्रीला सुरुवात झाली असून हे केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. अक्षरा व अधिपती लवकरच हनिमूनला जाणार असल्याचा सीक्वेन्स मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मालिकेची टीम शूटिंगसाठी परदेशात रवाना झाली आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेची संपूर्ण टीम थायलंड, फुकेत येथे गेली आहे. अक्षरा व अधिपती यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला रवाना झाली आहे. याची खास झलक शर्मिष्ठाने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली होती. तर, शिवानी रांगोळेनेदेखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आता मालिकेतील या सिक्वेन्सचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने नाशिकमध्ये बांधलं स्वतःचं अलिशान घर, प्रत्येक वस्तू आहे खास, Inside Video व्हायरल

या नवीन प्रोमोमध्ये अधिपती-अक्षरा थायलंडमधील समुद्रकिनारी धावताना पाहायला मिळत आहे. दोघांचा ‘कहो ना प्यार है’ या लोकप्रिय गाण्यावरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अधिपती-अक्षराचा खास लुकदेखील पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये नेहमी साडीत दिसणाऱ्या मास्तरीण बाई पांढऱ्या रंगाच्या वन-पीसमध्ये दिसत आहेत. तर अधिपतीनेही पांढऱ्या रंगाचा शर्ट व पॅंट परिधान केल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या नावाने तयार करण्यात आली सोन्याची नाणी, ‘तो’ रेकॉर्ड मोडणारा ठरला पहिला बॉलिवूड अभिनेता, सर्वत्र कौतुक

यावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “किती छान दिसतात दोघेही”, “नाद खुळा”, “अक्षरा एकदम वेगळीच दिसते”, “हा प्रोमो खूपच आवडला” अशा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडला नसल्याचे म्हटलं आहे. “दोघांना हे अजिबात सूट करत नाहीये”, “बंद करा ही मालिका”, “मालिकेत नवऱ्याच्या शब्दापुढे काहीच चालत नाही. अगदी मिळमिळीत मालिका आहे”, “यांनी खूपच खर्च केला आहे”, “मराठी मालिका अन् कॉपी करणार हिंदी गाण्याला?” अशा कमेंट्सद्वारे या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

Tags: marathi entertainment newsmarathi serialtula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada fame Akshara aka actress Shivani Rangole wished her husband Virajas Kulkarni for his new play by sharing special post

नवऱ्याच्या नवीन कामानिमित्त 'तुला शिकवीन...' फेम अक्षराची खास पोस्ट, म्हणाली, "खूप अभिमान वाटतो की..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.