छोट्या पडद्यावरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’च्या निमित्ताने अभिनेत्री शिवानी रांगोळे व अभिनेता ऋषिकेश शेलार ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळेने अक्षरा तर, अभिनेता ऋषिकेश शेलारने अधिपती हे पात्र साकारलं आहे. अधिपती हा श्रीमंत घरचा मुलगा आहे, तर अक्षरा ही एका शाळेतील शिक्षिका आहे. मालिकेत त्यांच्या नवीन केमिस्ट्रीला सुरुवात झाली असून हे केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.
अक्षरा व अधिपती लवकरच हनिमूनला जाणार असल्याचा सीक्वेन्स मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मालिकेची टीम शूटिंगसाठी परदेशात रवाना झाली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेची संपूर्ण टीम थायलंड, फुकेत येथे गेली आहे. अक्षरा व अधिपती यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम थायलंडला रवाना झाली आहे. याची खास झलक शर्मिष्ठाने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे. तर, शिवानी रांगोळेनेदेखील फुकेतमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच आता मालिकेतील या सिक्वेन्सचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे.
अशातच अक्षरा-अधिपती यांचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे थायलंडच्या समुद्रकिनारी एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अधिपती-अक्षरा थायलंडमधील समुद्रकिनारी धावताना पाहायला मिळत आहे. दोघांचा ‘कहो ना प्यार है’ या लोकप्रिय गाण्यावरील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अधिपती-अक्षराचा खास लुकदेखील पाहायला मिळत आहे.
या प्रोमोमध्ये नेहमी साडीत दिसणाऱ्या मास्तरीण बाई पांढऱ्या रंगाच्या वन-पीसमध्ये दिसत आहेत. तर अधिपतीनेही पांढऱ्या रंगाचा शर्ट व पॅंट परिधान केल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अवघ्या काही क्षणांतच चाहत्यांनी या नवीन प्रोमोला उत्तम प्रतिसाद दिला आहे. “किती छान दिसत आहेत दोघे”, “छान आहे मालिका”, “या दोघांची जोडी आवडते”, “हा प्रोमो खूपच आवडला” अशा अनेक कमेंट्सद्वारे या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.