बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान व अभिनेत्री करीना कपूर ही लोकप्रिय जोडी आहे. पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ साली दोघंही लग्नबांधनात अडकले. दोघांनी एकमेकांना डेट केले त्यावेळी त्यांच्या नात्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांनी नोंदणी पद्धतीने लग केले होते. करीना हिंदू व सैफ मुसलमान असल्याने त्यांच्या नात्यावर अनेक प्रश्नदेखील उपस्थित राहिले. अनेक वेळा टिकादेखील करण्यात आली. मात्र या सगळ्याकडे लक्ष दिले नाही. दोघांना तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. (kareena kapoor on karishma kapoor)
लग्नानंतरही चित्रपटांबरोबरच ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत असतात. त्यांच्या लग्नाला आता १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या १२ वर्षामध्ये दोघांच्या नात्यावर कोणते परिणाम झाले हे दोघांनीही स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची एक मुलाखत समोर आली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. त्यावेळी सैफबरोबर लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे लग्नानंतर कोणत्या गोष्टींवरुन भांडणं होतात याबद्दलही सांगितले आहे. करीनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “लग्नानंतर माझ्यामध्ये खूप चांगले बदल झाले. मी खूप जबाबदार झाले आहे”.
तसेच भांडणाविषयी करीना म्हणाली की, “एसीच्या तापमानावरुन आमच्यात नेहमी वाद होतात. कारण सैफला खूप थंड वातावरण हवं असतं आणि मला गरम वातावरण हवं असतं. पण सगळं झालं की आम्ही मधलं एक तापमान ठेवतो आणि झोपून जातो. तसेच कामामुळे एकमेकांना वेळ देऊ न शकल्यानेही आमच्यात वाद होतात”, असेही तिने सांगितले.
पुढे ती म्हणाली की, “जेव्हा करिश्मा आमच्या घरी येते तेव्हा सैफ खूप चिडचिड करतो. तिच्या घरातील एसीचे तापमान २५ डिग्री असते. त्यामुळे ती आमच्याकडे कधी आली तर तिला तितकेच एसीचे तापमान ठेवायचे असते. जेव्हा आम्ही जेवण करत असतो तेव्हा तेव्हाच हे सगळे घडते. यावर सैफ नेहमी म्हणतो बरं झालं माझं लग्न लोलोबरोबर न होता बेबोबरोबर झालं. काहीही असलं तरीही ती निदान एसीचं तापमान १९ वर ठेवते. छोट्या छोट्या कारणांवरुन आमचा घटस्फोट झाला असता असंही सैफ लोलोला मस्करीत बोलतो”, असेही तिने सांगितले.