‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत असतानाच मालिकेच्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अल्पावधीतच या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षरा व अधिपती यांचा मालिकेत बहरत जाणारा प्रेमाचा प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मात्र अक्षरा व अधिपती एकमेकांसमोर प्रेमाची कबुली केव्हा देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Tula shikvin changlach dhada promo comment)
अशातच आता अधिपती-अक्षराकडून अपेक्षित अशा प्रेक्षकांच्या पसंतीला पूर्णविराम मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून अक्षरा व अधिपती प्रेमाची कबुली देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नेहमीच त्यांना काही ना काही अडथळे येताना दिसले. अशातच आता मालिकेत एक रंजक ट्विस्ट आला असून अखेर अक्षराने अधिपतीसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावत आणि थेट कोल्हापुरी भाषेत अक्षराने अधिपतीसमोर प्रेम मान्य केलं आहे.
या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, थेट अक्षराने अधिपतीसमोर प्रेमाची कबुली दिली आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, अक्षरा अधिपतीला म्हणते, “मी समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर मला आयुष्य काढायचं आहे”. यावर अधिपती म्हणतो, “चिडावं कशाला?”. त्यानंतर अक्षरा म्हणते, “मी तुम्हाला सांगायचं किती प्रयत्न करतेय, तुमच्या लक्षात येतं नाही आहे का?”. यावर अधिपती विचारतो, “काय लक्षात येतं नाही आहे?”. तेव्हा अक्षरा म्हणते, “ठीक आहे. मग मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. तुम्हाला बघितलं की नाही की नुसता इशय हार्ड होतोय. अधिपती आय लव्ह यु”.
हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत पसंती दर्शिविली आहे. या प्रोमोखाली, “शेवटी तिने कबूल केले”, “अखेर प्रतीक्षा संपली”, “अधिपतीच्या डोळ्यातले भाव”, “विषय हार्ड हो अधीपती. एक नंबर”, “सांगितलं बाबा एकदाचं”, “ईशय नुस्ता हार्ड केला”, “बरं झालं सांगितलं लवकर अधिपतीला नाहीतर ती सरगम होतीच आग लावायला”, अशा कमेंट करत दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.