बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अशोक सराफांची स्वामी भक्ती, मुंबईतील प्रशस्त घरामध्ये आहे स्वामींचा फोटो, नियमित पूजाही करतात अन्…; पाहा Inside Video

Saurabh Moreby Saurabh More
जून 4, 2024 | 3:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok Saraf taking blessings of Swami Samarth after receiving the Maharashtra Bhushan award video viral.

अशोक सराफांची स्वामी भक्ती, मुंबईतील प्रशस्त घरामध्ये आहे स्वामींचा फोटो, नियमित पूजाही करतात अन्...; पाहा Inside Video

रंगभूमीचा रुपेरी पडदा, चित्रपटाची सोनेरी स्क्रीन किंवा अगदी टीव्हीच्या लहान स्क्रीन अशा मनोरंजनाच्या अनेक माध्यमांत आपली मुशाफिरी करणारे बहुरूपी अभिनेते म्हणजे म्हणजे अशोक सराफ. गेल्या पाच दशकांकडून अधिक काळ त्यांनी मराठी सोबतच हिंदी प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. या काळात त्यांनी ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात अढळ निर्माण केले. त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने अशोक मामा असं म्हणतात. अशोक मामांचा आज ७७ वा वाढदिवस आहे.   

आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेविश्वातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यावेळी ‘इट्स मज्जा’ने अशोक सराफ यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले होते. यावेळी पत्नी निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांचे औक्षण केले. तसेच यावेळी अशोक सराफ यांची मोठी बहीणही त्यांच्या घरी उपस्थित होती.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळताच अशोक सराफ यांच्या अनेक चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी अशोक सराफ यांनी केलेल्या कृतीचे खूपच कौतुक झालं. या खास क्षणाला अशोक सराफ यांनी त्यांच्या आई-वडिलांचेही आशीर्वाद घेतले. पत्नीसह त्यांनी आई वडिलांच्या फोटोला हार घालत त्यांचे आशीर्वाद घेतले. शिवाय अशोक सराफांनी स्वामीं समर्थांच्या फोटोला हार घालत स्वामींचेही आशीर्वाद घेतले.

आणखी वाचा – नेत्रा होणार आई, राजाध्यक्ष कुटुंब आनंदात असतानाच रुपालीची घरामध्ये एन्ट्री, देवीआईकडून पुन्हा नेत्राला संकेत, आता कोणतं संकट?

अशोक सराफांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली चाहत्यांनी अशोक सराफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली “श्री स्वामी समर्थ” अशाही अनेक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – Lok sabha Election 2024 : मंडीमधून कंगना रणौत तर मथुरामधून हेमा मालिनी आघाडीवर, अरुण गोविल यांचं काय होणार?, कोण मारणार बाजी?

दरम्यान, अशोक सराफ यांना यांना काही दिवसांपूर्वीच ‘महाराष्ट्र भूषण’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना यावर्षीचा ‘झी मराठी जीवनगौरव पुरस्कार’देखील मिळाला. त्याचबरोबर नुकताच त्यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर  प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार’ व नाट्य परिषदेचाही ‘जीवन गौरव पुरस्कार’ देण्यात आला आहे.    

Tags: ashok sarafASHOK SARAF BIRTHDAYmarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
shweta bachchan on aishwarya rai bachchan

सून, आई, बायको म्हणून चांगलं राहण्याचा ऐश्वर्या रायचा प्रयत्न, मात्र नणंदबाईशी अभिनेत्रीचं वाकडं, श्वेता बच्चन म्हणालेली, "ती खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.