Tula Shikvin Changlach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये गेले काही दिवस नवनवीन ट्विस्ट येतं आहेत आणि हे नवीन ट्विस्ट प्रेक्षकांनाही आवडत आहेत. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट हे प्रेक्षकांना कथानकाशी नेहमीच खिळवून ठेवतात. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. मालिकेत आतापर्यंत अक्षरा व अधिपती हनिमूनसाठी फुकेतला गेल्यावर अधिपतीचे वडील व भुवनेश्वरी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होते. या भांडणात अधिपतीचे वडील भुवनेश्वरीला घराबाहेर काढतात. जेव्हा अधिपती व अक्षरा घरी परत येतात, त्यावेळी त्यांना भुवनेश्वरी घरात नसल्याचे जाणवते. ते भुवनेश्वरीला सगळीकडे शोधतात पण ती त्यांना सापडत नाही. हे प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहे. (Tula Shikvin Changlach Dhada New Promo)
अशातच काही दिवसांपूर्वी मालिकेत चारुलता येणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. बाजारात अक्षराला एक बाई दिसते, ओळखीची वाटल्याने आणि भुवनेश्वरीच असू शकते या विचाराने ती तिचा पाठलाग करते. समोर आलेल्या बाईला ती भुवनेश्वरी समजत असते. पण समोरची महिला तुमचा काहीतरी गैरसमज झाल्याचे म्हणते. मी भुवनेश्वरी नसून चारुलता आहे, अशी ओळख ती सांगते. यानंतर त्या चारुलताने सूर्यवंशींच्या घरी प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यात चारुलता व अधिपती एकमेकांसमोर आले आहेत.
आणखी वाचा – Video : ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीने खरेदी केली महागडी कार, कुटुंबियांबरोबर पूजा आणि जल्लोष, व्हिडीओ व्हायरल
नुकताच या नवीन ट्विस्टचा प्रोमो झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमधून माय-लेकाची भेट होणार का? असं दिसून येत आहे. या नवीन प्रोमोमध्ये चारुलता व अधिपती एकमेकांसमोर आले असून चारुलता अधिपतीला आवाज देते. यानंतर अधिपती चारुलता व अधिपती एकमेकांकडे बघून हसतात. चारुलताला बघून अधिपतीला आनंद होतो तर अधिपतीही चारुलताला बघून हसतो.
मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसंच या नवीन ट्विस्टमुळे आता मालिकेच्या कथानकाविषयी उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता मालिकेत आणखी नवीन काय ट्विस्ट येणार? चारुलतामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काय नवीन वळण येणार? अधिपती चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न आगामी भागातून पाहायला मिळणार आहे.