मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक पठडीतले चित्रपट पाहायला मिळतात. विनोदी, सस्पेन्स, ॲक्शन चित्रपट, ॲनिमेटेड चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट, संगीत चित्रपट रोमॅंटिक चित्रपट, विज्ञानावर आधारित चित्रपट अशा अनेक श्रेणीतील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. पण अधिक प्रेक्षकवर्ग असा आहे ज्याला भयपट पाहणे खूप आवडते. सध्या बॉलिवूडमध्ये ‘स्त्री २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. तसेच याआधी ‘मुंज्या’ने देखील प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. पण याआधी आलेल्या चित्रपटांनी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. (Horror movies)
बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. काही चित्रपटांची जादू अजूनही कायम आहे. मात्र काही चित्रपटांना म्हणावी तितकी पसंती मिळू शकली आहे. पण जर तुम्हालादेखील भयपट पाहायला आवडत असतील तर काही चित्रपट असे आहेत जे तुम्ही आवर्जून पाहिले पाहिजेत. पण हे चित्रपट एकटे बघण्याचे धाडस करत असाल तर सांभाळूनच. जाणून घेऊया असे कोणते चित्रपट आहेत ते.
कंचना : हा चित्रपट भयपट व विनोद यांचे मिश्रण आहे. तमीळ भाषेतील हा चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने केले आहे. यामध्ये राई लक्ष्मी, आर. सारथकुमार, कोवई सरला, देवदर्शनी सुकुमारन, राघव लॉरेन्स अशी तंगडी स्टारकास्ट आहे. २०११ साली आलेल्या या चित्रपटाला खूप पसंती मिळाली होती. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.
कंचना २ : या चित्रपटाचा रिमेक २०१५ साली प्रेक्षकांच्या भेटीला अअला होता. यामध्ये राघव लॉरेन्स बरोबर मुख्य भूमिकेत तापसी पन्नूदेखील होती. या चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळाली होती.
अथिरन : हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात फहाद फाजील व साई पल्लवी हे कलाकार आहेत.हा चित्रपट हॉटस्टारवर पाहायला मिळेल.
आत्मा : हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये बिपाशा बासु, नवाजुद्दीन सिद्दीकी, जयदीप अहलावत हे कलाकार आहेत. या चित्रपटातील सगळी दृश्य अंगावर काटा आणणारा आहे.