स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून सावनी या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’सारखी मालिका किंवा ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये खेळलेल्या विविध टास्कद्वारे स्वतःचं वैशिष्ट्य दाखवून दिलं आहे. अपूर्वानं मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील पसंती मिळते. अशातच तिच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Apurva Nemlekar Buy New Car)
अभिनेत्री अपूर्वाने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रक्षाबंधनचं खास औचित्य साधत अपूर्वाने एक नवीन अलिशान गाडी खरेदी केली आहे आणि या नवीन गाडीची खरेदी करतानाचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या नवीन गाडीची अभिनेत्रीने आपल्या कुटुंबासह पूजाही केली. याचीच खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर करत असं म्हटलं आहे की, “रक्षाबंधन आणि तिसरा श्रावणी सोमवार या शुभमुहूर्तावर आम्ही ही नवीन गाडी खरेदी केली आहे. याक्षणी मी माझ्या भावाला अन् वडिलांची खूप आठवण येत आहे”.
अपूर्वाच्या या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षर कोठारी, मेघा धाडे यांसारख्या अनेक कलाकारांनी अपूर्वाला तिच्या नवीन गाडीनिमित्त शुभेच्छा दिल्या असून तिचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकानके मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती सावनी ही खलनायिका साकारत आहे. मुक्ता-सागरच्या संसारात दुरावा निर्माण करण्याचा सावनी पुरेपूर प्रयत्न करताना दिसते. अशा विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अपूर्वाने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.