Bigg Boss Marathi 5 : टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त व लोकप्रिय शो म्हणून ‘बिग बॉस’चे नाव घेतले जाते. प्रेक्षक हिंदी ‘बिग बॉस’सह ‘बिग बॉस’ मराठीदेखील तितक्याच आवडीनं पाहतात. ‘बिग बॉस मराठी ५’ सुरु झाल्यापासून अनेकजण या शोच्या प्रेमात आहेत. सामान्य प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही हा शो पाहतात आणि त्यावर आपली मतं सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत असतात. हा शो रोज पाहणारे व त्यावर टिपणी करणारे अनेक कलाकार आहेत. यांमध्ये मेघा धाडे, उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, अमृता देशमुख, किरण माने, पुष्कर जोग, सुरेखा कुडची, अनघा अतुल, विशाखा सुभेदार यांसारखे अनेक कलाकार आहेत. जे ‘बिग बॉस मराठी’बद्दल त्यांची मतं सोशल मीडियाद्वारे वीक करत असतात. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
अशातच गेल्या भागावर मराठी अभिनेता पुष्कर जोगने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वाचा उपविजेता व अभिनेता पुष्कर जोगने यासंदर्भात अरबाजकया वागण्यावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये पुष्करने असं म्हटलं आहे की, “बायकांवर हाडतुड करणारे, त्यांच्यावर केकाटणारे मर्द पुरुष यांचा मी निषेध करतो. आपल्या समाजात हे सगळं सामान्य आहे असा समज आहे. पण तेच सर्वात घातक आहे. घरातल्या इतरांनी याबद्दल आपली भूमिका घ्या. प्रत्येक स्त्री आपल्या आई व बहिणीसारखी आहे”.

यापुढे पुष्करने अरबाज व ‘बिग बॉस मराठी ५’चा उल्लेख करत ‘जोगबोलणारचं’ असा हॅशटॅगही वापरला आहे. तसंच यापुढे पुष्करने असं म्हटलं आहे की, “प्रिय स्पर्धक, हा शो खूप उत्तम आहे. त्यामुळे त्याला तसंच सांभाळा”. सध्या ‘बिग बॉस मराठी ५’ची चांगलीच चर्चा सुरु आहे. या घरातील स्पर्धकांना एकूण तीन आठवडे पूर्ण झाले असून या घरातून आतापर्यंत एकूण तीन स्पर्धकांनी निरोप घेतला आहे. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात निखिल दामले व योगिता चव्हाण यांनी घरातून निरोप घेतला.
दरम्यान, गेल्या शनिवार व रविवारी ‘बिग बॉस’च्या घरात भाऊचा धक्कावर रितेशने सर्वांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्याने घरातील सर्व स्पर्धकांची शाळा घेतली असून टीम Bबद्दल एकमेकांची चुगली सांगितली आहे. तसंच यावेळी सूरज हा सर्वांवर भारी पडत असल्याचेदेखील सांगितले. त्यामुळे आता आगामी भागात प्रेक्षकांना काय काय नवीन पाहायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.