‘गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या मुंबईसह संपूर्ण ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. श्रीकृष्णजन्माष्टमी हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्यरात्री साजरी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळकाल्याच्या दिवशी उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागते. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मालिकांमध्ये दहीहंडीच्या अनुषंगाने कथानक दिसणार आहे. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्येहजी दहीहंडीचा सण साजरा होणार आहे. नुकतंच या कथानकाशी संबंधित दहीहंडीचा एक नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतही दहीहंडीचा सण साजरा होणार असून यात नवीन ट्विस्टही येणार असल्याचे या नवीन प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. अधिपतीही दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक होऊन तयार होतो. पण चारुलता त्याला इतक्या उंच थरावर दहीहंडी लावून फोडणे बरे नाही असा सल्ला देते. अधिपती चारुलताचं बोलणं न ऐकताच निघून जातो. अधिपतीसाठी दहीहंडीच्या इथे कट रचला गेला आहे. ज्यामुळे त्याला हंडी फोडताना दुखापत होऊ शकते.
आणखी वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळताच कलाकारांचा संताप, रितेश देशमुख म्हणाला, “राजे आम्हाला…”
अधिपती दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर चढतो. मात्र त्याला पाडण्यासाठी एक प्लान केला आहे. अधिपती हंडी फोडायला वर चढताच त्याच्या खालील माणूस खांदा हलवतो, ज्यामुळे अधिपती पडावा असा प्लान असतो. जो अयशस्वी होत असल्याचे या प्रोमोमधून दिसून येत आहे. अधिपतीवरील संकट ओळखून अक्षरा तिथे येते आणि ती अधिपतीला पडण्यापासून वाचवते. खांदा काढून घेतल्यामुळे अधिपती हंडीच्या दोरीला लटकतो. मात्र इतक्यात अक्षरा शिडी घेऊन येते आणि ते दोघे मिळून दहीहंडी फोडतात.
आणखी वाचा – Video : गिरगावच्या चाळीत दहीहंडीमध्ये मनसोक्त नाचायचे प्रदीप पटवर्धन, जुना व्हिडीओ व्हायरल, चाहतेही भावुक
दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये सुर्यवंशीच्या घरात गोकुळाष्टमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. चारुहास आणि अक्षरा साग्रसंगीत पुजा मांडतात. श्रीकृष्णाचा पाळणा हलवला जातो. अक्षरालाया सोहळ्यात काही बायकां बाळ होण्यावरुन चिडवतात. पण, चारुलता बायकांना चांगलीच समज देते. चारुलताने पाठीशी उभं राहणं अक्षराला भावनिक करतं. यावेळी भुवनेश्वरी व चारुलतामध्ये किती फरक आहे याची जाणीव अधिपतीला सोडून सगळ्यांनाच होते.